Eknath Khadse & Chandrakant Patil
Eknath Khadse & Chandrakant PatilSarkarnama

एकनाथ खडसेंना धक्का; बोदवड नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात

ही निवडणूक रोहिणी खडसे यांनी प्रतिष्ठेची केली होती.
Published on

कैलास शिंदे

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना धक्का देत शिवसेनेने बोदवड नगरपंचायत वर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे (Shivsena) आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांना राजकीय धक्का दिला.

Eknath Khadse & Chandrakant Patil
निफाडला अनिल कदमच बॅास; राष्ट्रवादीच्या आमदार दिलीप बनकरांना धक्का

माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात बोदवड नगरपंचायत आहे,खडसे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाल्यानंतर प्रथमच त्यांच्या मतदार संघात या नगरपंचायतीची निवडणूक झाली. या निवडणुकीत एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या रोहिनी खडसे यांनी ताकद लावली होती.तर शिवसेना नेते जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकात पाटील यांनीही जोरदार प्रचार केला होता.

Eknath Khadse & Chandrakant Patil
हरिश्चंद्र चव्हाणांनी जेपी गावितांचा बालेकिल्ला एकहाती जिंकला

या निवडणुकीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत १७ पैकी ९ जागा जिंकून बहुमत मिळवित सत्ता मिळविली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ ७ जागा मिळाल्या भारतीय जनता पक्षाला देखील यश मिळाले नाही. त्यांचा एक उमेदवार चिठ्ठीवर विजयी झाला आहे. काँग्रेस पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.

एकनाथ खडसे यांना या निकालाने मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेने बाजी मारली आहे.तर भाजपचे गिरीश महाजन यांनाही धक्का बसला आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com