केंद्र सरकार ठामपणे कांदा उत्पादकांच्या पाठींशी राहील!

राज्यमंत्री भारती पवार यांनी कांदा उत्पादनाबाबात मंत्री पियुष गोयल यांना अवगत केले.
Piyush Goyel & Dr Bharti Pawar
Piyush Goyel & Dr Bharti PawarSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : गेले वर्षभर विविध नैसर्गिक तसेच हवामानाच्या अडचणींमुळे कांदा उत्पादन घटले. शेतकऱ्यांना (Farmers) मोठी आर्थिक झळ बसली. यातून बाहेर पडण्यासाठी सध्याच्या हंगामात मोठ्या प्रामणात कांदा लागवड केली आहे. यातून शेतकऱ्यांपुढे नव्या समस्या उभ्या राहण्याची शक्यता आहे. त्याबाबत आरोग्य राज्यमंत्री डॅा. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल (Piyush Goel) यांची भेट घेऊन त्यांना अवगत केले.

Piyush Goyel & Dr Bharti Pawar
आता प्रवासीही एसटी कर्मचाऱ्यांना विसरले? खासगी वाहक देणार तिकीट!

नवी दिल्ली येथे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री गोयल यांच्या भेटीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील आणि विशेषतः नाशिकच्या कांदा उत्पादन व शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात यंदा मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली आहे. कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात अपेक्षीत आहे. अशा स्थितीत बाजारातील मागणी तसेच उत्पादनाचा विचार करता शेतकऱ्यांना अडचणी येऊ नये यासाठी सजग रहावे लागेल. म

Piyush Goyel & Dr Bharti Pawar
मी सेना मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची चोपडी खोलेल!

यंदा विविध कारणांमुळे कांदा लागवडीचा खर्च बघता, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव आहे. या भागातील कांदा हे हुकमी नगदी पिक असल्यामुळे शेतकरी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील अडचणींवर मात करून जास्त प्रमाणात कांदा उत्पादन घेतात याविषयी डॉ. पवार यांनी परिस्थिती मांडली.

गेल्या दोन वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सतत आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. त्यासाठी त्यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी मंत्री पियुष गोयल यांनी केंद्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. अडचणीच्या काळात भविष्यातही शेतकऱ्यांसोबत राहील अशी ग्वाही दिली.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com