आता प्रवासीही एसटी कर्मचाऱ्यांना विसरले? खासगी वाहक देणार तिकीट!

बससेवा पूर्वपदावर आणण्यासाठी महामंडळाच्या प्रशासनाने केले नियोजन
MSRTC Strike
MSRTC StrikeSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : विलीनीकरणाच्या मुद्यावर संपकरी एसटी (ST) कर्मचारी ठाम असल्‍याने एसटी महामंडळातर्फे (employees on Strike) पर्यायी मार्गांची चाचपणी केली जाते आहे. अशात यापूर्वी कंत्राटी स्वरूपात चालकांचा आधार घेतल्‍यानंतर आता कंत्राटी स्वरूपात वाहकांचा आधार घेतला जाणार आहे. एसटी गाड्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशिन पुरवण्याचे कंत्राट असलेल्‍या ट्रायमॅक्स कंपनीला वाहक पुरविण्याचे कंत्राट दिले असल्‍याची माहिती मिळते आहे.

MSRTC Strike
महाराष्ट्राच्या राज्यपालांना हटवा; ‘राष्ट्रवादी’च्या युवकांचे राष्ट्रपतींना पत्र

यापूर्वी संपात सहभागी झालेले कर्मचारी तुरळक प्रमाणात कामावर हजर होत आहेत. तत्‍पूर्वी बससेवा पूर्वपदावर आणण्यासाठी कंत्राटी स्वरूपात चालक उपलब्‍ध करण्यात आले होते. सध्या कंत्राटीचालकांसह कामावर हजर झालेल्‍या वाहकांमार्फत बसगाड्या धावत आहेत. त्यामुळे नाशिक विभागातून धावणाऱ्या बसगाड्यांची संख्या अडीचशेपर्यंत पोचलेली आहे. वाहकांची संख्या कमी असल्‍याने अनेक तांत्रिक अडचणी उद्‍भवत आहेत. अशात आता प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळाने कंत्राटी वाहकांच्‍या भरतीसाठी प्रयत्‍न सुरु केले आहेत. ट्रायमॅक्स कंपनीच्‍या माध्यमातून कंत्राटी वाहक उपलब्‍ध केले जाणार आहेत.

MSRTC Strike
`ईडी`ची कारवाई केल्याने भाजप विरोधात सत्य बोलणे थांबवणार नाही!

दरम्‍यान या कंपनीकडून ५४ वाहक उपलब्‍ध झालेले असून, त्यांचे सध्या प्रशिक्षण सुरु असल्‍याचे समजते. तसेच एसटी वाहन परीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांना चालक आणि वाहतूक नियंत्रकांना वाहकाची जबाबदारी दिलेली होती. त्‍यासाठी अतिरिक्‍त भत्ता देऊ केलेला असतानाही प्रतिसाद मिळाला नव्‍हता. अशात आता कंत्राटी वाहकांचा आधार घेत एसटी बससेवा सुरळीत करण्याचा प्रयत्‍न केला जात आहे.

मोक्‍याच्‍या बसस्‍थानकांवर असणार उपलब्‍ध

कंत्राटी पद्धतीने उपलब्‍ध होणारे वाहक मोक्‍याच्‍या बसस्‍थानकांवर उपलब्‍ध असतील. याशिवाय प्रवाशांची वर्दळ असलेल्‍या बसथांब्‍यांवरही नियुक्‍ती केली जाईल. या वाहकांकडून प्रवाशांना थांब्‍यावरच तिकीट उपलब्‍ध करून दिले जाईल. त्यामुळे बसमध्ये वाहक उपलब्‍ध नसतील.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com