पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथचा कार्यक्रम ८२ तीर्थस्थळांवर झाला लाईव्ह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केदारनाथ येथे आद्य शंकराचार्यांच्या मूर्तीचे अनावरण झाले.
Devendra Phadanvis at Trimbakeshwar
Devendra Phadanvis at TrimbakeshwarSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : नैसर्गिक आपत्ती तसेच अन्य कारणांनी चार धाम येथील मंदिरे व परिसराची हानी झाली. त्याच्या विकासासाठी केंद्र सरकारने मोठा काय्रक्रम हाती घेतला आहे. त्याचा भाविक व पर्यटकांना मोठा लाभ होईल, अशी माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendrs Phadanvis) यांनी सांगितले.

Devendra Phadanvis at Trimbakeshwar
राष्ट्रवादीचे भाजपला साकडे, निदान ओवाळणी म्हणून तरी महिलांना स्वस्त सिलिंडर द्या!

आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केदारनाथ येथे आद्य शंकराचार्यांच्या मूर्तीचे अनावरण तसेच विविध विकासकामांचा शिलान्यास झाला. त्यानिमित्त भारतीयजनता पक्षाने देशातील ८२ धार्मिक स्थळांवर तो कार्यक्रम लाईव्ह केला. त्यासाठी भाजपच्या विविध नेत्यांनी हजेरी लावली. त्यानुसार आज श्री. फडणवीस त्र्यंबकेश्वर येथे उपस्थित होते.

Devendra Phadanvis at Trimbakeshwar
शिवसेनेचे मनोज मोरे म्हणतात, `मी कचरा व्यवसायात भागीदार, त्यात गैर काय`

यावेळी त्रंबकेश्वर मंदिराच्या आवारात सकाळी ९ ते ११ या कालावधीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ते म्हणाले, बारा ज्योतिर्लिंग व चारधाम तीर्थस्थळांचा सर्वतोपरी विकासाचा संक्लप केंद्र सरकारने केला आहे. त्याचा लाभ कोट्यावधी भाविक व तीर्थयात्रींना होईल. त्याचबरोबर भाविक व पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच असेल.

ते पुढे म्हमाले, विविध ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले. तेथील भाविकांच्या श्रध्दास्थांनांची पुन्हा निर्मिती तसेच दुरुस्ती करण्यात येत आहे. केंद्र सरकार बारा ज्योतिर्लिंग व चारधाम यात्रा या भागाचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.

यावेळी महंत सागरानंद सरस्वती यांसह त्र्यंबकेश्वर येथील विविध आखा़डे व धार्मिक संस्थांचे महंत, देवस्थानचे पदाधिकारी, नगराध्यक्ष पुरषोत्तमम लोहगावकर, सुयोग वाडेकर, विष्णू दोभाडे, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com