केंद्रातील भाजपचे सरकार बनलेय सावकार!

सावखेडा (ता. रावेर) येथे वीज उपकेंद्राचे भूमिपूजन करताना राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत.
Nitin Raut
Nitin RautSarkarnama
Published on
Updated on

रावेर : केंद्र सरकार (Centre Government) सध्या सावकार झाले असून, विजेचे पैसे दिल्याशिवाय त्यांच्याकडून वीज मिळत नाही, तसेच वीज निर्माण करण्यासाठी पैसे लागत असल्यामुळे आता ग्राहकांनीही नियमितपणे वीजबिल भरावे व आपली थकबाकी द्यावी, आम्ही त्यांना एक टक्का सूट देऊ, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री (Power Minister) नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केले. (Centre`s government became moneylender now a days)

Nitin Raut
शिवसेनेच्या `धर्मवीर`ची भाजपच्या `काश्मीर फाईल्स`ला टक्कर!

तालुक्यातील सावखेडा येथील वीज उपकेंद्राचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार शिरीष चौधरी अध्यक्षस्थानी होते.

यावेळी ऊर्जामंत्री डॉ. राऊत व आमदार चौधरी यांनी उपस्थित जिल्हा परिषदेच्या सदस्या सुरेखा पाटील, पंचायत समिती सदस्या प्रा. डॉ. प्रतिभा बोरोले, सावखेडा बुद्रुक आणि खुर्द येथील सरपंच अनुक्रमे लता पाटील व बेबाबाई बखाल आणि कार्यकर्त्या लता मोरे यांना भूमिपूजन करण्याची संधी दिली.

Nitin Raut
पाणी देऊ शकत नाही, त्या भाजप व त्यांच्या महापौरांना काय म्हणावे?

डॉ. राऊत म्हणाले, की कोरोना, अतिवृष्टी, चक्रीवादळ आणि महापूर यासारख्या काळातही राज्य शासनाने आणि वीज विभागाने संपूर्ण राज्याला सतत वीजपुरवठा केला. आता सध्या कोळसा वाहतुकीसाठी रेल्वेलाही मोठ्या प्रमाणात पैसा द्यावा लागत आहे आणि वीज खरेदी करताना केंद्र सरकारलाही पैसे द्यावे लागत आहेत. वीज उत्पादन करण्यासाठीही पैसे लागतात. या पार्श्वभूमीवर ग्राहकांनीही वीजबिल भरावे. थकबाकी भरून सहकार्य करावे. शेतकऱ्यांसाठीची कृषी विकास योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेची माहिती देऊन फायदा घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

प्रारंभी डॉ. राऊत यांनी ज्येष्ठ नेते (कै.) मधुकरराव चौधरी यांना अभिवादन करून त्यांची कार्यशैली पूज्य साने गुरुजींसारखी व महाराष्ट्रासाठी आदर्श असल्याचे सांगितले. आमदार चौधरी यांनी आपल्या भाषणात ४७ अंश सेल्सिअस तापमानातही केळी हिरवीगार असल्याबद्दल शेतकऱ्यांबद्दल गौरवोद्गार काढत त्याचे श्रेय सातत्यपूर्ण वीजपुरवठ्यालाही दिले. वीज वितरण कंपनीचे जळगाव विभागाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी प्रास्ताविक केले. सावखेडा येथील वीज उपकेंद्रासाठी तीन कोटी ८२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, येत्या आठ महिन्यांत हे काम पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा पाटील, पंचायत समिती सदस्या प्रा. डॉ. प्रतिभा बोरोले, विभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, यावलचे तहसीलदार पवार, रावेरचे प्रभारी तहसीलदार संजय तायडे, हरीश गनवाणी, तुकाराम बोरोले, शेखर बडगे, कल्पना गावंडे, पंकज वानखेडे, जगदीश ढोले उपस्थित होते.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com