मालेगाव : महिन्यापूर्वी राजकीय वातावरणनिर्मितीचा (Politics) भाग म्हणून देशभरातील भाजप (BJP) `काश्मीर फाईल्स` (Kashmir files) चित्रपटाच्या प्रचारात गुंतले होते. त्या चित्रपटाला महाराष्ट्रात शिवसेनेचा (Shivsena) `धर्मवीर` (Dharmveer at post Thane) आव्हान देणार काय? अशी स्थिती आहे. चित्रपटातील व्यक्तीरेखा, सत्य घटनांवर आधारीत कथानक व नेत्यांनी ठिकठिकाणी केलेले त्यांचे इव्हेंट पाहता धर्मवीर चित्रपट त्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. (will Shivsena`s Dharmveer give fight to Kashmir files)
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावरील आधारीत प्रविण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटास शहरात जोरदार प्रतिसाद मिळाला. युवा सेनेतर्फे येथील संदेश सिनेमॅक्स चित्रपटगृहात मोफत शो आयोजित केला होता. या खेळाला युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या घोषणा दिल्या. जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी सिनेमागृहाचे आवार दणाणून गेले होते.
धर्मवीर आनंद दिघे व शहराचा जुना ऋणानुबंध आहे. कृषिमंत्री दादा भुसे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या कार्याने प्रभावित होवूनच समाजकारण व राजकारणात सक्रिय झाले.
नाशिक रोडला नेत्यांची हजेरी
नाशिक रोडच्या रेजिमेंटल प्लाझा मधील सिनेमॅक्स चित्रपटगृहात सकाळी व दुपारी नागरिकांना मोफत दाखविण्यात आले. योगेश देशमुख, नीलेश शिरसाट, योगेश गाडेकर, विक्रांत थोरात यांनी आयोजन केले. या वेळी माजी समाजकल्याण मंत्री बबन घोलप, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, सीमा डावखर, सुधाकर जाधव, योगिता गायकवाड, पद्मा थोरात, लक्ष्मण गाडेकर, सूर्यकांत लवटे, राजेंद्र ताजणे, दिलीप शिरसाट, नितीन चिडे, किरण डहाळे, विकास गिते, चंदू महानुभव, दीपक ठणके, किरण ढोले, सन्नी गाडेकर आदी उपस्थित होते.
शिवसेनेतर्फे मोफत शो
शिवसेनेने धर्मवीर या चित्रपटाचा जोरदार प्रचार, प्रसार सुरु केला आहे. आज मालेगावच्या शिवसेना महिला आघाडी व कामगार सेनेतर्फे महिलांसाठी सकाळी साडेअकराला मोफत शो ठेवण्यात आला आहे. याशिवाय १५ मेस दुपारी जाणता राजा व शहर-तालुका शिवसेनेतर्फे शिवसेना कार्यकर्त्यांसाठी दुपारी साडेतीनला मोफत शो ठेवण्यात आला आहे.
नांदगाव येथे आमदार सुहास कांदे यांनी नागरिकांसाठी हा चित्रपट मोफत दाखविला. यावेळी श्री. कांदे यांसह विविध शिवसेनेचे नेते उपस्थित होते.
.....
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.