Purandar Vidhan Sabha: एकनाथ शिंदे-अजितदादांमध्ये खटका उडाला ? पुरंदरचा राजकीय 'तह' फिसकटला ! बंडखोर रिंगणात

Shinde request to Ajit Pawar Regarding Sambhaji Zende: विजय शिवतारे यांच्या विरोधातील संभाजी झेंडे यांची उमेदवारी मागे घ्यावी अशी विनंती शिंदे यांनी अजित पवार यांना केली होती तर त्या बदल्यात भोरमधील बंडखोरी शिंदे यांनी थोपवावी असे पवार हे शिंदे यांना म्हटल्याची माहिती आहे.
Ajit Pawar  Eknath Shinde
Ajit Pawar Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Pune News: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. त्यापूर्वी चार नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या तारखेला बहुतांश बंडखोरांनी उमेदवारी मागे घेतली असली तरी काही मतदारसंघात अद्यापही बंडखोरी कायम आहे. त्यामध्ये भोर विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे.

भोरमधून अजित पवारांच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात शिंदेंचे बंडखोर निवडणूक रिंगणात आहेत. तर पुरंदर विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या उमेदवाराविरोधात अजित पवारांनी अधिकृत उमेदवार मैदानात उतरवला आहे.

पुरंदर विधानसभा मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेचे विजय शिवतारे रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात अजित पवारांचे अधिकृत उमेदवार आहेत. भोरमधून ठाकरे सेनेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झालेले शंकर मांडेकर हे निवडणूक लढवत आहेत. विरोधात शिंदेतील बंडखोर निवडणूक रिंगणात आहेत. यामुळे या दोन मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार आमने-सामने आल्याने महायुतीत टेन्शन वाढले आहे.

Ajit Pawar  Eknath Shinde
RajendraKumar Gavit News : भाजपला सोडचिठ्ठी दिलेले राजेंद्रकुमार गावित काँग्रेसचा 'हात' हाती घेणार अन् विधानसभाही लढवणार!

पुरंदर विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिंदेंना सुटला असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शिंदे यांच्या शिवसेनेतील माजी आमदार विजय शिवतारे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर अजित पवारांनी संभाजी झेंडे यांना अधिकृत उमेदवार म्हणून उतरवला आहे. त्यामुळे या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

दुसरीकडे भोर विधानसभा मतदारसंघात अजित पवारांनी ऐनवेळी ठाकरे यांचे जिल्हाप्रमुख असलेले शंकर मांडेकर यांना पक्षात घेत उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात मागील दोन विधानसभा निवडणुका लढलेले शिंदेंच्या सेनेतील कुलदीप कोंडे यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे.

Ajit Pawar  Eknath Shinde
Jalgaon Rural Assembly: दहा वर्षानंतर दोन गुलाबराव आमने-सामने; आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये लढत

या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार आणि शिंदे यांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात आल्याने पवार आणि शिंदे यांच्यामध्ये खटका उडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे . पुरंदर विधानसभा मतदारसंघातून विजय शिवतारे यांच्या विरोधातील संभाजी झेंडे यांची उमेदवारी मागे घ्यावी अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना केली होती तर त्या बदल्यात भोर मधील बंडखोरी एकनाथ शिंदे यांनी थोपवावी असे पवार हे शिंदे यांना म्हटल्याची माहिती आहे.

Ajit Pawar  Eknath Shinde
Gopal Shetty: फडणवीसांनी ED चा डाव लावताच गोपाळरावांचा आव, ताव अन् भाव कोसळला!

मात्र दोन्ही ठिकाणी उमेदवार कायम असल्याने भोर आणि पुरंदरमुळे पवार-शिंदे यांच्यात खटका उडल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये हा वाद कायम राहून शिंदे आणि दादांचे शिलेदार भिडणार की ऐनवेळेस हे दोन्ही नेते महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंब्याचं पत्र देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com