Chandrakant Patil Politics: सत्ताधारी आमदारालाच अटक, मुक्ताईनगर कडकडीत बंद, काय आहे कारण?

Chandrakant Patil; Farmers angry over compensation for acquired lands for highway -मुक्ताईनगर चे नागरिक उतरले रस्त्यावर, सरकारच्या भूमिकेचा केला निषेध
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Chandrakant Patil News: राज्याच्या विविध भागात महामार्गांच्या कामावरून शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. हैदराबाद- इंदूर रस्त्याचे भूसंपादन देखील वादात सापडले आहे. या प्रश्नावरून मुक्ताईनगरचे शेतकरी संतापल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. डबल इंजीन सरकारच्या सत्ताधारी आमदारांनाच आंदोलनात उतरावे लागले.

केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे डबल इंजिन सरकार आहे. जळगाव जिल्ह्यातील बहुतांशी संस्थांवर देखील भाजपचीच सत्ता आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सत्ताधाऱ्यांनाच आंदोलनात उतरण्याची वेळ आली आहे. मुक्ताईनगर शहरात सध्या आंदोलनामुळे वातावरण चांगलेच तापले आहेत.

मुक्ताईनगर (जळगाव) येथे हैदराबाद- इंदूर महामार्गाच्या भूसंपादनाचा तिढा अधिक किचकट झाला आहे. या महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनींना अतिशय कमी भाव मिळाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. त्या विरोधात सातत्याने आवाज उठवूनही न्याय न मिळाल्याने यापूर्वी नागरिकांनी आंदोलन केले होते.

Chandrakant Patil
Honey Trap Scandal: संजय राऊत यांच्या नथीतून एकनाथ खडसेंचा भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर तीर!

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम बंद पाडले. कंत्राटदाराकडून या संदर्भात लिखित हमी घेण्यात आली होती. मात्र अचानक कंत्राट दाराने पोलीस बंदोबस्तात पुन्हा काम सुरू केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

उत्पादित केलेल्या जमिनींना ज्यादा भाव मिळावा यासाठी संतापलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा महामार्गाचे काम बंद पाडले. यावेळी झालेल्या रस्ता रोको आंदोलनात सबंध गावकरी उतरल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनीही शेतकऱ्यांची बाजू घेत आंदोलन केले.

या आंदोलनानंतर पोलिसांनी कठोर भूमिका घेत आमदार चंद्रकांत पाटील यांसह आंदोलकांना अटक केली. अटकेनंतर वातावरण आणखी चिघळले असून मुक्ताईनगर शहर कडकडीत बंद करण्यात आले. काल दिवसभर बंद आणि आंदोलनामुळे परिसरात तणावाची स्थिती होती.

संपादित केलेल्या जमिनींना मोबदला देताना राज्य शासनाने दुजाभाव केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. अन्य प्रकल्प आणि महामार्ग यांच्यासाठी संपादित केलेल्या जमिनींना ज्यादा भाव देण्यात आला आहे. मुक्ताईनगरच्या शेतकऱ्यांवर मात्र अन्याय झाल्याने जादा भाव वेळेपर्यंत महामार्गाचे काम सुरू होऊ देणार नाही, असा ठाम इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

यांचीही राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. आमदार पाटील यांनी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची चर्चा केली. जमिनींना मोबदला देण्याबाबत फेरविचार करावा अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सत्ताधारी आमदारांनाच आंदोलन करण्याची वेळ आली आहे. या आंदोलनामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचीही अडचण होण्याची चिन्हे आहेत.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com