Honey Trap Scandal: संजय राऊत यांच्या नथीतून एकनाथ खडसेंचा भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर तीर!
Khadse Vs Mahajan News: हनी ट्रॅप प्रकरणात राज्यभर सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. प्रकरणाची राजकीय धग सत्ताधारी पक्षाच्या काही मंत्र्यांनाही बसू लागली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक राज्य सरकारला अडचणीत आणण्याची कोणतीही संधी सोडायला तयार नाहीत.
बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपांवरून आता नवे राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी हा मुद्दा पुन्हा उचलून धरला आहे. त्यामुळे जळगावचे राजकारण चर्चेत आले आहे.
माजी मंत्री खडसे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य केले आहे. हनी ट्रॅप प्रकरणात संशयित असलेल्या प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात मुंबईसह पुण्यातही गुन्हा दाखल झाला आहे. प्रफुल लोढा याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याशी निकटचे संबंध होते असा आरोप केला जातो.
या संदर्भात एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा जलसंपदा मंत्री महाजन यांना दिवचले आहे. श्री खडसे म्हणाले, हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित प्रफुल्ल लोढा एव्हढा व्हीआयपी आहे का? तो कधी एव्हढा मोठा झाला? त्याला विशेष महत्त्व का दिले जात आहे. याबाबतचे कारण शोधण्याची गरज आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी हनी ट्रॅप प्रकरणाचे धागेद्वारे मुंबई पासून नाशिक आणि जळगाव पर्यंत असल्याचे म्हटले होते. आता हनी ट्रॅप प्रकरण थेट जामनेर पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे त्याची निष्पक्ष चौकशी होण्याची आवश्यकता आहे.
श्री खडसे यांच्या या विधानाने जलसंपदा मंत्री महाजन चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यांनी आणि ट्रॅप प्रकरणात संशयित असलेल्या लोढा याचे भाजपशी काहीही संबंध नाहीत. लोढा याचे यापूर्वी कोणत्या नेत्यांशी संबंध होते हे सांगितले तर अनेकांना धक्का बसेल. खडसे यांनी हनी ट्रॅप प्रकरणावरून काहीही विधाने करू नयेत, असे देखील महाजन यांनी खडसावले.
श्री खडसे यांनी राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. जलसंपदा मंत्री महाजन यांनी माझ्याबाबत केलेल्या आरोपांची एसआयटी किंवा सीबीआयकडून चौकशी करावी असे आव्हान दिले होते. त्याबाबत देखील महाजन यांनी खडसे यांना उत्तर दिले. खडसे स्वतःच मी रॉकेलच्या मोटरसायकलवर फिरत होतो असे म्हटले आहे. मग त्यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली? असा सवाल महाजन यांनी केला आहे.
या निमित्ताने हनी ट्रॅप प्रकरणावरून जळगावचे राजकारण तापले आहे. विशेषता जामनेर येथील प्रफुल्ल लोढा याला या प्रकरणात पोलिसांनी अटक केल्यानंतर अनेकांच्या भुवया ताणल्या गेल्या आहेत. या निमित्ताने एकनाथ खडसे यांना जलसंपदा मंत्री आणि आपले पारंपरिक विरोधक गिरीश महाजन यांना अडचणीत आणण्याची संधी मिळाली.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.