Chandrashekhar Bavankule Politics: मंत्र्यांनाही विकासकामांत मागे टाकणारा 'तो' आमदार आहे तरी कोण?

Chandrashekhar Bavankule;BJP leader Bawankule became generous, MLA Anup Agarwal conferred title of Janapati-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तीन वर्षात जमले नाही ते त्या आमदाराने सहा महिन्यात केले.
Chandrashekhar Bavankule & Anup Agrawal
Chandrashekhar Bavankule & Anup AgrawalSarkarnama
Published on
Updated on

Chandrashekhar Bavankule News: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवारी धुळे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. मंत्री बावनकुळे यांनी या दौऱ्यात सर्वच भाजप लोकप्रतिनिधींवर कौतुकाचा वर्षाव केल्याने हा दौरा चर्चेचा विषय ठरला.

भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने धुळे येथे गुंतवणूक परिषद झाली. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी विविध घोषणा केल्या. या घोषणांची तातडीने अंमलबजावणी केली जाईल. या परिषदेमुळे परिसराच्या विकासाला चालना मिळेल असा दावाही त्यांनी केला.

Chandrashekhar Bavankule & Anup Agrawal
Sadabahu Khot Politics: खोत यांचा रोख कोणावर?... म्हणाले, ऊस उत्पादकांचे कैवारी आता साखर कारखाने भाड्याने चालवत आहेत!

यावेळी मंत्री बावनकुळे चांगलेच फार्मात आले होते. त्यांनी मंत्री जयकुमार रावल, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. मात्र यावेळी त्यांनी धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांचे विशेष कौतुक केल्याने ते सगळ्यांच्या स्मरणात राहिले.

Chandrashekhar Bavankule & Anup Agrawal
Vasant Gite Politics: शिवसेना ठाकरे पक्षाचा महापालिकेला कडक इशारा, खाजगीकरण थांबवा अन्यथा...

मंत्री बावनकुळे यावेळी म्हणाले, मी मंत्रालयाचा पायऱ्या चढत तीन वर्ष मला जे जमले नाही ते, आमदार अनुप अग्रवाल यांनी सहा महिन्यात करून दाखवले. मंडळात एमआयडीसीच्या प्रश्नावर त्यांनी जोरदार आवाज उठवला. विविध प्रश्नांचा अतिशय चिकाटीने पाठपुरावा केला. त्यांच्यामुळेच धुळ्याच्या एमआयडीसीच्या विकासाला गती मिळणार आहे.

आमदार अग्रवाल तीन वर्षांपूर्वी एक कार्यकर्ता म्हणून मला मंत्रालयात भेटले होते. धुळे शहराचे प्रश्न अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत त्यांनी अतिशय कल्पकतेने उपाय देखील सुचविले. तेव्हाच मी त्यांना तुम्हाला आमदार व्हायचे आहे असे सांगितले होते.

आमदार अनुप अग्रवाल यांनी धुळे शहराच्या प्रश्नांवर अतिशय आग्रही भूमिका मांडत काम केले आहे. एमआयडीसीच्या जागेसाठी अतिशय आग्रही भूमिका मांडल्याने ते यशस्वी झाले. या शहराने त्यांना विधिमंडळात पाठवले त्यामुळे ते खऱ्या अर्थाने ‘जनपती’ ठरले आहेत.

मंत्री जयकुमार रावल हे अतिशय लोकप्रिय आहेत. मंत्री मंडळात ते सातत्याने आणि वेगवेगळे विषय घेऊन सक्रिय असल्याने त्यांचे कौतुक होत असते. खासदार डॉ. भामरे यांनी गेल्या दहा वर्षात मतदारसंघात रेल्वे आणि रस्त्यांचे अनेक कामे पूर्ण केली. त्याचा एमआयडीसी सह या परिसराच्या विकासाला मदत होत आहे. एकंदरच महसूल मंत्री बावनकुळे यांनी आपल्या दौऱ्यात भाजपच्या प्रत्येक लोकप्रतिनिधींचे तोंड भरून कौतुक केले.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com