Chandrashekhar Bawankule Politics: चंद्रशेखर बावनकुळे यांनी डोळे वटारताच साक्रीचे भाजप बंडखोर शरण, नगराध्यक्षांची पडली विकेट!

Chandrashekhar Bawankule Warns BJP Rebels: भाजपच्या अंतर्गत राजकारणात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नगरसेवकांची मात्र झाली फरपट.
Chandrashekhar Bawankule & Jayshree Pawar
Chandrashekhar Bawankule & Jayshree PawarSarkarnama
Published on
Updated on

BJP Internal Conflict Sakri Update: साक्री नगरपालिकेत भारतीय जनता पक्ष स्वबळावर सत्तेत आहे. मात्र नगरसेवकांतील अंतर्गत कुरगुडीच्या राजकारणामुळे भाजप येथे सत्ता गमावतो की काय अशी स्थिती होती. या राजकारणावर आता पडदा पडला आहे.

साक्रीच्या नगराध्यक्षा, भाजपचा जयश्री पवार यांच्या विरोधात १२ नगरसेवकांनी केलेले बंड फसले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नगरसेवकांना सज्जड दम भरला आहे. मात्र या कुरघोडीच्या राजकारणात नगराध्यक्ष आणि बंडखोर उपनगराध्यक्ष दोघांनाही आपली पदे गमवावी लागली आहेत.

भाजपच्या नगराध्यक्ष जयश्री पवार यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाचे उपाध्यक्ष बापू गीते यांनी उठाव केला होता. त्यांना भाजपचा शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या चार नगरसेवकांनी साथ दिली. त्यामुळे गेल्या आठवड्यात घडलेल्या राजकीय नाट्याला प्रशासनाच्या मदतीने कलाटने मिळत नगराध्यक्ष पवार यांचे पद थोडक्यात वाचले होते.

Chandrashekhar Bawankule & Jayshree Pawar
Nashik Politics : हिंदी सक्तीच्या माघारीनंतर ठाकरेसेनेचा विश्वास वाढला; आता पुढचं टार्गेट सिंहस्थ कुंभमेळा, विरोधकांना केलं मोठं आवाहन

त्यानंतर नगराध्यक्ष पवार यांनी भाजपचे उपनगराध्यक्ष गीते यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बारा लाख रुपयांचे प्रकरण आणि त्यावरील फाईलवर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने हे बंड करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. उपनगराध्यक्ष यांची विविध भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आणल्याने हा वाद सुरू झाल्याचा गंभीर आरोप भाजपच्या नेत्यांवर झाला होता.

Chandrashekhar Bawankule & Jayshree Pawar
BJP Politics : बडगुजर प्रवेशावरुन भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतला धडा, कुणाल पाटील प्रवेशाआधी 'ती' चूक सुधारली

या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांवर दाखल झालेला अविश्वास ठरावावर चर्चेसाठी येत्या ४ जुलैला विशेष सभा होणार होती. आधीच नेत्यांनी हस्तक्षेप करीत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या निवासस्थानी सर्व नगरसेवकांना पाचारण केले होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी बंड करणाऱ्या नगरसेवकांची चांगलीच खरडपट्टी काढली. पक्षातील प्रश्न बाहेर मांडणे आणि चर्चा घडवणे अयोग्य असल्याचे सांगत तातडीने नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष दोघांनाही राजीनामे देण्याची सूचना केली.

यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अमरीश भाई पटेल, आमदार अनुप अग्रवाल, विजय चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नगराध्यक्ष उपनगर अध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेविका यांना तातडीने राजीनामे देण्यात सांगण्यात आले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी नगराध्यक्ष पवार, उपनगराध्यक्ष गीते आणि स्वीकृत नगरसेविका पुनम काकुस्ते यांनी धुळ्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे आपले राजीनामे सादर केले.

भारतीय जनता पक्षातील अंतर्गत बंडखोरीचा फायदा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या चार नगरसेवकांनी घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानिमित्ताने पूर्ण बहुमत असूनही साखरे नगरपालिकेत शिवसेना शिंदे पक्षाचा सत्तेत शिरकाव झाला असता.

काँग्रेसच्या एकमेव नगरसेवकांनी या बंडाला सक्रिय पाठिंबा दिला होता. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी डोळे वाटतात भाजप नगरसेवक शरण गेले. यामध्ये एकनाथ शिंदे पक्षाच्या नगरसेवकांचे मात्र हात दाखवून अवलक्षण अशी स्थिती झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com