Chhagan Bhujbal: भुजबळ म्हणाले, "आगामी पाच वर्षात प्रत्येकाला घर देणार"

Chhagan Bhujbal Starts Election Campaign in Yeola: मंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदार संघात निवडणूक प्रचाराला आज सुरुवात केली.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Yeola Vidhan Sabha: मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला मतदार संघातून प्रचाराचा नारळ वाढवला. यावेळी त्यांनी विरोधकांचा संयमाने समाचार घेतला. त्यांचा फोकस प्रामुख्याने विकासावर होता.

येवला मतदार संघातून प्रचाराचा नारळ वाढवताना त्यांच्या व्यासपीठावर विविध समाजाचे नेते होते. आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार कल्याणराव पाटील, अंबादास बनकर, डी. के. जगताप, बाळासाहेब क्षिरसागर, पंढरीनाथ थोरे, राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे होते.

या विविध प्रतिनिधीक आणि महायुतीचे नेते उपस्थित होते. यातून त्यांनी आपल्या विरोधकांना संदेश दिला. उपस्थित नेत्यांनी आपल्या विकासासाठी छगन भुजबळ यांना मतदान करा. आगामी निवडणुकीत येवला मतदार संघात दुसरा कोणताही पर्याय नाही, असे आवाहन केले.

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी जातीचे विष पेरण्याचे काम विरोधक करीत आहेत, असा आरोप केला. ज्यांच्याकडे सांगण्यासारखे आणि करण्यासारखे काहीही नसते, ते निवडणुकीत जातीचा आधार घेतात. आपण मात्र सर्वांसाठी काम करतो.

Chhagan Bhujbal
Rohit Pawar : रोहित पवार यांनी हिशेबच मांडला, भाजपच्या दृष्टीने मतदाराची किंमत ३० पैसे!

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील एका जातीवर विसंबून राहून निवडणूक जिंकता येत नाही, असे म्हटले आहे. त्यामुळेच ते निवडणुकीपासून लांब राहिले आहेत. यापासून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला जुन्नर मतदार संघाचा विकास करण्यासाठी सांगितले होते. मात्र मी येवल्याची निवड केली. या भागाच्या विकासासाठी मला काम करायचे होते. ते काम मी करून दाखवले आहे.

या मतदारसंघात पाणी आणले. 38 गावांची पाण्याची योजना राज्यात फक्त येवला येथेच सुरू आहे. अनेकांना त्याचे आश्चर्य वाटते. ते विचारतात हे कसे घडले?. आमचे उत्तर असते, हा भुजबळ पॅटर्न आहे.

Chhagan Bhujbal
Saroj Ahire: देवळालीत उमेदवारीचा पेच, आमदार सरोज अहिरे की अहिरराव? उद्या होणार फैसला!

समुद्राला वाहून जाणारे आणि अन्न राज्याला जाणारे सर्वच्या सर्व पाणी आपल्याला अडवायचे आहे. गोदावरी खोऱ्यात पाणी आणून हा परिसर सुजलाम सुफलाम करायचा आहे. तसा निर्धार मी केला आहे. आगामी काळात येत्या पाच वर्षात प्रत्येकाला घर मिळेल, असा माझा प्रयत्न राहील. मागेल त्याला घर दिले जाईल. कोणीही झोपडपट्टीत राहणार नाही, असा माझा प्रयत्न असेल असे भुजबळ म्हणाले.

मंत्री भुजबळ पुढे म्हणाले, मला विकास करायचा आहे. त्यावरच मी काम करतो आहे. कुणी वंदा, कुणी निंदा, मात्र विकास करणे हाच आमचा धंदा. हे सांगायला मी कुठेही कचरणार नाही. अख्ख्या भारतात जी योजना नाही ती मी येवल्यात आणली आहे.

येवल्यात 17 एकर जागेत ग्रामसदन उभे राहिले आहे. सर्व प्रशासकीय अधिकारी आणि विभाग नगरपालिका हे एकाच ठिकाणी आणले. त्यामुळे सर्वांची कामे एकाच ठिकाणी होतात, असे अनेक प्रकल्प सांगता येतील.

मी आमदार झालो तेव्हा येवल्यात पाच पैठणीची दुकाने होती. आता ती 500 झाली आहेत. पर्यटन मंत्री असताना सर्व तीर्थस्थळे आणि मंदिरांच्या विकासाचा प्रकल्प मी राबवला. त्यातून जिल्ह्यातील अनेक मंदिरांचा कायापालट झाला. त्या तीर्थक्षेत्रांचा विकास झाला, असा दावाही भुजबळ यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com