Saroj Ahire: देवळालीत उमेदवारीचा पेच, आमदार सरोज अहिरे की अहिरराव? उद्या होणार फैसला!

Devlali Assembly Constituency: शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने एबी फॉर्म दिलेल्या राजश्री अहिरराव यांना यापूर्वीच उमेदवारी मागेघेण्याच्या सूचना पक्षाने दिल्या आहेत.
Saroj Ahire & Rajshree Ahirrao
Saroj Ahire & Rajshree AhirraoSarkarnama
Published on
Updated on

Mahayuti News: देवळाली विधानसभा मतदारसंघात आमदार सरोज अहिरे या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार आहेत. मात्र शिवसेना शिंदे गटाने येथे राजकीय पेच निर्माण केला आहे. त्यामुळे अधिकृत उमेदवार कोण? हा वाद सुरू आहे.

देवळाली विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने राजश्री अहिरराव यांना एबी फॉर्म दिला होता. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मात्र स्थानिक नेत्यांच्या राजकीय भूमिकेमुळे तसे होऊ शकले नाही. राजश्री अहिरराव अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दिवसभर नॉट रिचेबल होत्या. दुसऱ्या दिवशी त्या प्रकट झाल्या.

आता अहिरराव यांनी आपणच अधिकृत उमेदवार असल्याचे सांगत प्रचार सुरू करणार असल्याचा दावा केला आहे. या राजकीय वादात माजी खासदार हेमंत गोडसे यांनी वरिष्ठ नेते सूचना देत नाहीत तोपर्यंत कोणाचाही प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेतली.

Saroj Ahire & Rajshree Ahirrao
Nirmala Gavit Politics: काँग्रेसच ठरलं; इगतपुरीतून माजी आमदार निर्मला गावित उमेदवार!

या वादामुळे आता देवळाली मतदारसंघात महायुतीच्या दोन उमेदवार आहेत. त्यातील अधिकृत उमेदवार कोण यावरून गोंधळ सुरू झाला आहे. दरम्यान आमदार सरोज अहिरे या विद्यमान आमदार असल्याने त्यांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या त्या अधिकृत उमेदवार आहेत. महायुतीचे बहुतांशी घटक पक्ष आणि कार्यकर्ते त्यांचा प्रचार करीत आहेत.

स्थानिक नेत्यांच्या राजकीय हेवे दावे आणि डावपेचांमुळे अहिरराव यांच्या महत्वकांक्षेला पंख फुटले आहेत. परिणामी विद्यमान आमदार सरोज अहिरे आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवार अहिराव यांच्यातच झुंज लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात देवळाली मतदारसंघात दिलेले एबी फॉर्म विषयावर चर्चा झाली.

याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वीच निर्णय देखील घेतला आहे. त्यामुळे उद्या मुख्यमंत्री शिंदे देवळाली मतदारसंघाबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामध्ये शिंदे पक्षाच्या उमेदवार अहिरराव यांना उमेदवारी मागे घेण्याची सूचना केली जाण्याची शक्यता आहे.

Saroj Ahire & Rajshree Ahirrao
Hemant Godse Politics: `नांदगाव कनेक्शन!` पराभवाचे खापर गोडसेंनी अखेर फोडले छगन भुजबळांवर

त्याला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. या निमित्ताने देवळाली मतदारसंघात दोन उमेदवार असल्याने अधिकृत उमेदवार कोण? या पेचामुळे महायुतीतील नेत्यांत वादविवाद आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्याला उद्या पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com