Chhagan Bhujbal Politics: आजारी भुजबळांनी दवाखान्यातून `या`साठी घेतला ४ तासांचा डिस्चार्ज!

Chhagan Bhujbal, Bhujbal took four hours discharge from hospital to attend Nashik program-अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सध्या बॉम्बे रुग्णालयात उपचार घेत आहेत.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News: महात्मा ज्योतिबा फुले दांपत्याच्या सर्वात मोठ्या अर्ध पुतळ्याचे अनावरण शनिवारी नाशिक मध्ये झाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते.

देशातील सर्वात मोठा पुतळा अशी बिरूदावली मिरवणाऱ्या या कार्यक्रमाच्या लोकार्पणासाठी मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. या पुतळ्याची संकल्पना आणि कार्यक्रमाचे आयोजन मंत्री भुजबळ यांच्याच संकल्पनेतून झाले होते. त्यामुळे त्यांची उपस्थिती अपेक्षित होतीच.

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात महात्मा फुले यांच्या भिडे वाडा स्मारकाला भेट देणार होते. यावेळी मंत्री भुजबळ प्रकृती बरी नसताना पुणे शहरात आले होते. त्यांना घशाचे इन्फेक्शन झाले होते. अशक्तपणा असल्याने बोलतानाही त्रास होत होता.

यावेळी पंतप्रधानांचा दौऱ्या रद्द झाला. त्यामुळे वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने मुंबईला रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. शनिवारी झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी देखील त्यांच्यावर उपचार सुरू होते.

Chhagan Bhujbal
Eknath Shinde politics: मुख्यमंत्री म्हणाले, भाजपच्या आमदार सीमा हिरे ही तर माझी लाडकी बहीण!

मात्र या कार्यक्रमाला उपस्थित रहाणे आवश्यक वाटल्याने त्यांनी रुग्णालयातून चार तासांसाठी डिस्चार्ज घेतला. अडीचच्या सुमारास ते बॉम्बे हॉस्पिटल मधून बाहेर पडले. खास विमानाने नाशिकला आले. कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर सायंकाळी सातला ते पुन्हा मुंबईला परतले.

सायंकाळी साडेसातला ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पुन्हा दाखल झाले. नाशिकच्या या कार्यक्रमासाठी प्रकृती बरी नसताना त्यांनी रुग्णालयात उपचार सुरू असताना चार तासांसाठी डिस्टार्ज घेतल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमात आपल्या भाषणादरम्यान याचा उल्लेख केला. मंत्री भुजबळ यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. योग्य उपचार घ्यावेत, असे त्यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal
Girish Mahajan Politics: गिरीश महाजन यांचे खडसेंना सडेतोड उत्तर, 'तुमचे राजकारण संपले'

मुंबईत रुग्णालयात उपचार सुरू असताना आणि पावसाचे वातावरण असताना देखील श्री भुजबळ रुग्णालयातून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ही माहिती मिळाल्यावर त्यांनी भुजबळ यांच्याकडून याबाबत माहिती घेतली. आरोग्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या.

नाशिकमध्ये गेले दोन दिवस माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ या कार्यक्रमाचे नियोजन करीत होते. समता परिषदेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी देखील या कार्यक्रमात विशेष लक्ष घातले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com