Chhagan Bhujbal Politics: येवल्यात मंत्री छगन भुजबळ विरोधकांनी आळवले राजकीय सहमतीचे सूर!

Yeola Constituency : नांदूर मधमेश्वर येथील विकास कामांच्या लोकार्पणात भुजबळ विरोधी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची मांदियाळी.
Chhagan Bhujbal & Amruta Pawar
Chhagan Bhujbal & Amruta PawarSarkarnama
Published on
Updated on

Yeola Constituency News: येवला मतदार संघात मंत्री छगन भुजबळ यांच्या इच्छेशिवाय शासकीय यंत्रणांचे पानही हालत नाही. सोमवारी मात्र वेगळेच घडले. भुजबळ विरोधकांनी मंत्री भुजबळ यांच्या शिवाय चक्क शासकीय विकास कामांचे लोकार्पण केले. मात्र हा कार्यक्रम वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.

निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर हे मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघातील एक प्रमुख गाव आहे. या ठिकाणी भाजप नेत्या अमृता पवार तसेच जिल्हा परिषदेच्या माजी सभापती श्रीमती दराडे आणि अन्य नेत्यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामे झाली. त्यांचे लोकार्पण करण्यात आले.

हा कार्यक्रम होऊ नये यासाठी पडद्यामागून शासकीय अधिकाऱ्यांना बऱ्याच सूचना आल्याची चर्चा होती. मात्र या कार्यकर्त्यांनी अट्टाहासाने लोकार्पणाचा कार्यक्रम केला. त्यात मंत्री भुजबळ यांचेही पत्रिकेवर नाव होते. मात्र ते उपस्थित नव्हते.

या निमित्ताने भाजपच्या अमृता पवार, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे मतदारसंघ प्रमुख शिवा सुराशे, जिल्हा अध्यक्ष कुणाल दराडे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयदत्त होळकर हे चार इच्छुक उमेदवार एकत्र आले होते. यावेळी या प्रत्येक उमेदवाराने आपल्या भाषणातून विधानसभा निवडणुकी संदर्भात संकेत देण्याचा प्रयत्न केला.

Chhagan Bhujbal & Amruta Pawar
Narhari Zirwal : अजितदादा की पवारसाहेब, नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टच सांगितले

शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांनी निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्यावर सहमतीचे राजकारण करावे. परस्परांना मदत करावी, असा त्यांचा कल होता. त्यात भाजपच्या अमृता पवार यांनीही सर्व एकत्र आल्यास त्याला सहमती दर्शवली. त्यामुळे विकासकामांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुचक राजकीय शेरेबाजी झाली.

आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सध्या जोरात सुरू आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे धोरण आणि उमेदवार ठरविण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रमुख भूमिका असेल. श्री. भुजबळ आणि शरद पवार यांच्यातील राजकीय संबंध कसे आहेत, हे सर्वज्ञात आहे. त्याचा येवल्याच्या निवडणुकीवर परिणाम अपरिहार्य आहे.

या निवडणुकीत मराठा आरक्षण, महायुतीतील राजकीय विसंवाद, लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीची सरशी असे विविध विषय चर्चेत आहेत. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील देखील येवल्यात येणार आहेत.

Chhagan Bhujbal & Amruta Pawar
Balasaheb Thorat : केंद्रातील भाजपची घमेंड महाराष्ट्राने उतरवली; थोरातांनी फसव्या योजनांवर घावच घातला

मंत्री भुजबळ यांनी मतदारसंघातील मोठ्या योजना पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांचे समर्थक त्यासाठी झटत आहेत. दुसरीकडे भुजबळ विरोधकही एकवटले आहेत. नांदूर मधमेश्वर येथे काल झालेल्या कार्यक्रमातून भुजबळ यांच्या विरोधकांनी परस्पर राजकीय सहमतीचा राग आळवला आहे. तो प्रत्यक्षात आल्यास येवला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक नक्कीच रंगतदार होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com