Narhari Zirwal : अजितदादा की पवारसाहेब, नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टच सांगितले

NCP Narhari zirwal Ajit Pawar : नरहरी झिरवाळ म्हणाले, मी जमिनीवर राहून जनतेच मनं जिकलं. गोकुळला देखील मी हेच सांगतो की त्याने हे काम करावं. मी जनतेचा अज्ञाधारक आहे. गोकुळ माझा अज्ञाधारक आहे.
Ajit Pawar- Narhari Zirwal
Ajit Pawar- Narhari ZirwalSarkarnama
Published on
Updated on

Narhari zirwal News : अजित पवार गटात असलेले आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ यांनी ते मी महाविकास आघाडीत आणि पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीत आहे, असे म्हटले होते. आपली छाती फाडली तरी शरद पवार साहेबच दिसतील, असे गोकुळ म्हणाले होते. त्यामुळे नरहरी झिरवळ अजित पवारांची साथ सोडणार असल्याच्या चर्चा होत्या.

या चर्चांवर आज (सोमवारी) नरहरी झिरवाळ यांनी अजितदादा की पवारसाहेब याचे स्पष्ट उत्तर देऊन टाकले आहे. तसेच गोकुळचा बाप मी आहे. गोकुळ माझा बाप नाही, असे सांगत गोकुळ माझे ऐकेल, असे स्पष्ट केले.

'पहिल्यांदा ज्या पक्षात गेलो, आताही त्या पक्षात आहे. भविष्यातही तिथेच राहणार आहे. मी शेवटपर्यंत अजितदादांसोबत राहणार आहे', या शब्दांत नरहरी झिरवळ यांनी ते अजित पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील नरहरी झिरवाळ यांची बाजु घेत ते अजितदादांसोबतच आहेत, असे ठासून सांगितले.

Ajit Pawar- Narhari Zirwal
Aditya Thackeray News : नोव्हेंबरमध्ये आमचं महाविकास आघाडीचं सरकार येईल; त्यानंतर... आदित्य ठाकरेंचा महायुतीला इशारा

जनतेचे मन जिंकलं

नरहरी झिरवाळ म्हणाले, मी जमिनीवर राहून जनतेच मनं जिकलं. गोकुळला देखील मी हेच सांगतो की त्याने हे काम करावं. मी जनतेचा अज्ञाधारक आहे. गोकुळ माझा अज्ञाधारक आहे. तो मला डावलून कसा जाईल? असे म्हणत नरहरी झिरवाळ यांनी गोकुळ आपल्यासोबत राहिल असा विश्वास व्यक्त केला.

बाप विरुद्ध मुलगा लढत?

दिंडोरी मतदारसंघाचे नेतृत्व नरहरी झिरवाळ करत आहेत. ते अजित पवार गटात आहेत. त्यांचे पुत्र गोकुळ झिरवळ यांनी ते शरद पवार गटात असल्याचे सांगितले आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे देखील गोकुळ यांनी सांगितले आहे. त्यामुळे जर गोकुळ यांचे मन वळवण्यात नरहरी झिरवाळ अयशस्वी ठरले तर या मतदारसंघात बाप विरुद्ध पुत्र अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Ajit Pawar- Narhari Zirwal
Rajya Sabha Session : जया अमिताभ बच्चन... असे पुकारताच जया बच्चन भडकल्या! राज्यसभेत सुनावले खडेबोल...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com