Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळांनी पुन्हा दाबली दुखरी नस, म्हणाले, जिल्हा बँक कोणामुळे संकटात गेली हे देखील शोधा!

Chhagan Bhujbal; Chhagan Bhujbal point out shall be investigate. investigat who is responsible for ndcc bank loss-आर्थिक संकटात रुतलेल्या जिल्हा बँकेच्या अवस्थेला जबाबदार कोण? हे शोधण्यासाठी समिती नेमण्याची आवश्यकता मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केली.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News: नाशिक जिल्हा बँक आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत व्याज माफ करावे या मागणीसाठी शेतकरी नेते छगन भुजबळ यांच्याकडे गेले होते. या नेत्यांना मंत्री भुजबळ यांनी नेमक्या दुखण्यावर बोट ठेवत कांडपिचक्या दिल्या.

नाशिक जिल्हा बँक आर्थिक संकटात सापडली आहे. बँकेचा बँकिंग परवाना नाबार्ड केव्हाही रद्द करू शकते. या स्थितीत बँकेवर राज्य सहकारी बँकेचे प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी बँकेच्या नेमक्या दुखण्यावर परखडपणे मतप्रदर्शन केले आहे.

यानिमित्ताने मंत्री भुजबळ यांनी पुन्हा एकदा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांसह जिल्ह्यातील सहकारातील विविध नेत्यांना डिवचले आहे. जिल्हा बँकेच्या आर्थिक नुकसान आणि थकबाकीसह चुकीच्या कर्ज वाटपाबाबत २६ राजकीय नेते आणि बँकेच्या संचालकांना दोषी धरण्यात आले आहे. तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

Chhagan Bhujbal
Tribal Agitation Politics: नरहरी झिरवाळ पुन्हा धावले बिऱ्हाड मोर्चेकर्‍यांच्या मदतीला... विषय मंत्रिमंडळात नेणार!

महाराष्ट्र राज्य शेतकरी संघर्ष समिती आणि नाशिक जिल्हा बँक कर्जमुक्त अभियान पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मंत्री भुजबळ यांची भेट घेतली. बँकेच्या कर्ज वसुली मोहिमेत सुधारणा नोकरून व्याज माफ करावे अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली. व्याजामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा दावा या शिष्टमंडळाने केला.

जिल्हा बँकेच्या ५४ हजार थकबाकीदारांवर वसुलीची आणि कारवाईची टांगती तलवार आहे. याबाबत नवनियुक्त प्रशासकांनी एक रकमी सेटलमेंट योजना जाहीर केली आहे. त्यात व्याजामध्ये मोठी सवलत देण्यात आली आहे. मात्र आंदोलन त्याबाबत ना खुश आहेत.

बँकेच्या छोट्या शेतकरी कर्जदारांची संख्या ५४ हजार आहे. त्यांची थकबाकी ९०० कोटी रुपये आहे. त्यावर बाराशे कोटी रुपये व्याज आहे. व्याजात सवलत दिल्यास मध्यम मुदतीचे कर्ज दहा हप्ते करून दिल्यास शेतकरी तातडीने भरणा करतील, असा दावा या शिष्टमंडळाने केला.

संबंधित शिष्टमंडळाकडून सातत्याने बँकेविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. कर्ज वसुली थांबविणे आणि व्याजात सवलत देणे या मागणीवर हे आंदोलक ठाम आहेत. मात्र जिल्हा बँक संकटात आणणाऱ्या नेते आणि संचालकांबाबत हे आंदोलक मौन बाळगून असल्याने यापूर्वीही आश्चर्य व्यक्त होत होते.

मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र नेमकेपणाने दुखरी नस दाबली आहे. त्यात बँकेला संकटात आणणाऱ्यांचाही शोध घेतला जावा, या भुजबळ यांच्या मागणीला ठेवीदार आणि कर्जदारांनी ही सहमती व्यक्त केली आहे. नाशिक जिल्हा बँकेने चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप केल्याचा आरोप विविध नेत्यांवर आहे. त्यात सहकार विभागाने नोटीस देखील बजावली आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com