Tribal Agitation Politics: नरहरी झिरवाळ पुन्हा धावले बिऱ्हाड मोर्चेकर्‍यांच्या मदतीला... विषय मंत्रिमंडळात नेणार!

Narhari Zirwal;The issue of the Adivasi Birhad Morcha will come up in the cabinet meeting tomorrow-गत चौदा दिवसांपासून आदिवासी विकास भवनचा रस्ता रोखलेल्या बिऱ्हाड आंदोलकांचा प्रश्न उद्या मंत्रिमंडळात मांडणार
Narhari Zirwal with Trible agitation
Narhari Zirwal with Trible agitationSarkarnama
Published on
Updated on

Narhari Zirwal News: राज्यातील आश्रम शाळा आणि शाळांमधील कर्मचारी चौदा दिवसांपासून आंदोलन करीत आहे. त्यांचे बिऱ्हाड आदिवासी विकास भवनच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून आहेत. त्यामुळे या मोर्चाने राज्यभरातील आदिवासींसह विविध नेत्यांचे लक्ष वेधले आहे.

राज्य शासनाने बाह्यस्त्रोत भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. नरहरी झिरवाळ यांनी याबाबत मध्यस्थी केली. मात्र आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी कंत्राटी भरती करणार यावर ठाम असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राज्यभरातील आदिवासी संघटना आणि लोकप्रतिनिधी मोर्चेकर्‍यांच्या पाठीशी उभे राहिल्याचे चित्र आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून हे आंदोलन सुरू आहे. मात्र प्रशासनाकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नाही. पावसाळी अधिवेशन सुरू असतानाही त्यावर कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Narhari Zirwal with Trible agitation
Manikrao Kokate Politics: शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी आव्हान देत थेट कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर उधळले पत्ते!

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ या आंदोलकांच्या मागण्या सोडविण्याबाबत सातत्याने प्रयत्नशील आहेत. ते पुन्हा एकदा या आंदोलकांच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांनी सोमवारी या आंदोलकांची भेट घेऊन तासभर त्यांच्याशी चर्चा केली. हा प्रश्न उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित करण्याचे आश्वासन मंत्री झिरवाळ यांनी दिले आहे.

नाशिक जिल्हा कर्मचारी कृती समितीने या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांची संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. कामगार नेते डॉ डी. एल. कराड यांनी हा विषय आमदारांनी थेट मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत करावा असे आवाहन केले होते. पार्श्वभूमीवर मंत्री झिरवाळ यांनी महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

राज्य शासनाने गेली दहा ते अकरा वर्ष कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बाह्यस्त्रोत अर्थात कंत्राटदारामार्फत यापुढे आश्रम शाळा आणि निवासी आश्रम शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. या कर्मचाऱ्यांना कायम करावे अथवा सेवेत नियमित ठेवावे या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचारी बिऱ्हाड घेऊन आदिवासी विकास भवन येथे घेराव घालून बसले आहेत.

राज्यभरातील आदिवासी आमदार आणि नेत्यांनी तसेच सामाजिक संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र भारतीय जनता पक्ष या मागणीची सहमत असल्याबाबत कोणीही पाठिंबा दिलेला नाही. आदिवासी विकास मंत्री डॉ उईके यांनी या आंदोलकांशी चर्चा करण्यास देखील नकार दिला आहे. कंत्राटी कर्मचारी नियुक्ती बाबत ते ठाम असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हे आंदोलन आता चिघळण्याचे शक्यता व्यक्त होत आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com