Chhagan Bhujbal Politics: सिंहस्थ कुंभमेळा; छगन भुजबळांनी टोचले गिरीश महाजनांचे कान!

Chhagan Bhujbal; Chhagan Bhujbal poked Minister Girish Mahajan's ears over the Simhastha Kumbh Mela-विकासाच्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी नाशिकच्या नियोजनाबाबत प्रशासनाला दिला परखड सल्ला.
Chhagan Bhujbal & Girish Mahajan
Chhagan Bhujbal & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने विकास कामांचा हजारो कोटींचा आराखडा तयार केला आहे. मात्र सिंहस्थ कुंभमेळा साजरा करणे म्हणजे फक्त विकास कामे नव्हे, असे परखड मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. या माध्यमातून त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांचेही कान टोचण्याचा प्रयत्न केला.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र प्राधिकरण तयार केले आहे. त्याचे काम मंत्री गिरीश महाजन यांच्यामार्फत पाहिले जात आहे. मंत्री महाजन यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रस्ते, पूल आणि तत्सम घोषणा केल्या आहेत. त्यावर हजारो कोटी रुपये खर्च होणार आहेत.

यासंदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रस्ते, उड्डाणपूलांची उभारणी म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा नव्हे. कुंभमेळ्यासाठी कोट्यावधी भाविक येणार आहेत. ते रस्ते आणि पूल बांधण्यासाठी येणार नाहीत. गोदावरीत स्नान करण्यासाठी भाविक येणार आहेत. हे समजून घेतले पाहिजे, या शब्दात भुजबळ यांनी आपले परखड मत व्यक्त केले.

Chhagan Bhujbal & Girish Mahajan
Devendra fadnavis Politics: देवाभाऊंच्या त्या घोषणेने सहकारातील नेते धास्तावले... संस्थांपुढे येणार अडचणी!

सिंहस्थ कुंभमेळा उत्तम प्रकारे करायचा असेल तर गोदावरी प्रदूषण मुक्त करणे हे मुख्य काम आहे. गोदावरी स्वच्छ करण्याचे काम तातडीने हाती घ्यायला पाहिजे. महापालिकेची मलनिस्सारण प्रकल्पांची कामे राजकीय नेत्यांमार्फत होत आहे, असा गंभीर प्रश्न देखील भुजबळ यांनी उपस्थित केला.

Chhagan Bhujbal & Girish Mahajan
Girish Mahajan Politics: गिरीश महाजन यांच्या 'हंड्रेड प्लस'चा आता शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानेही घेतला धसका?

मला निसारण प्रकल्प चालविणारी राजकीय नेतेमंडळी फक्त नफा कसा मिळेल याचाच विचार करतात. त्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च वाचविला जातो. पाण्यावर प्रक्रिया न करताच ते गोदावरीत सोडले जाते. त्यामुळे गोदावरी प्रदूषित होत आहे, असा नेमका निष्कर्ष भुजबळ यांनी मांडला आहे.

पुणे आणि मुंबई शहराशी तुलना करून उंच उंच इमारती उभारण्याकडे सध्या नाशिककरांचा कल दिसतो आहे. पण फक्त मुंबई आणि पुणे शहराचा विकास पाहतो. तेथील समस्या आणि त्यांचे स्वरूप विचारात घेत नाही. याचा देखील विचार केला पाहिजे. आपले नाशिक शहर मुंबई, पुण्यासारखे समस्याग्रस्त होता कामा नये, हा विचार रुजविणे महत्त्वाचे आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहराच्या समस्या नेमकेपणाने मांडल्या. विशेषता गोदावरी प्रदूषणावर त्यांनी नेमके निदान केले आहे. शहराच्या विकासासाठी आणि गोदावरी प्रदूषण मुक्त करण्यासाठी गिरीश महाजन त्याची दखल घेणार का? याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com