Chhagan Bhujbal News: आशिया खंडातील सर्वात मोठ्या कांदा बाजार समितीबाबत भुजबळांचा दावा चुकला; डिझेल टंचाईमुळे शेकडो ट्रक अडकले

Lasalgaon Onion Market : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मतदारसंघात नागरिकांना आश्वस्त केले होते. आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची लासलगाव बाजार समिती भुजबळ यांच्यात मतदारसंघात आहे. याच ठिकाणी भुजबळ यांनी डिझेलचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला होता.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: देशभरात इंधन टंचाईने तीव्र स्वरूप धारण केले आहे. पेट्रोल पंपांवर शेतकरी रात्रभर ताटकळत असल्याचे चित्र आहे. काँग्रेसने विविध राज्यात सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. अमेरिका इराण युद्धाच्या स्थितीतही पेट्रोल पंप सुरळीत सुरू होते. सध्या मात्र डिझेल टंचाई तीव्र झाली आहे. गेल्या चार दिवसांत तीनवेळा दरवाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक आणि शेतकरी अस्वस्थ आहेत.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लासलगाव येथे पुरवठा सुरळीत सुरू आहे. कुठेही टंचाईची स्थिती नाही. काही ठिकाणी राज्यात डिझेलच्या मागणीत सरासरीच्या तुलनेत वाढ झाल्याचा दावा केला होता.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मतदारसंघात नागरिकांना आश्वस्त केले होते. आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची लासलगाव बाजार समिती भुजबळ यांच्यात मतदारसंघात आहे. याच ठिकाणी भुजबळ यांनी डिझेलचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला होता.

मात्र, मंत्री भुजबळ यांची पाठ फिरताच वेगळेच चित्र पुढे आले. डिझेलची टंचाई असल्याने शेकडो ट्रक बाजार समितीत अडकून पडले आहे. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कांदा देशाच्या बाजारपेठांमध्ये पाठविला जाऊ शकत नाही.

Chhagan Bhujbal
BJP News: एकहाती पालिकेची सत्ता मिळवलेल्या भाजपसमोर नवं टेन्शन; पुण्यात 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'ची जोरदार चर्चा; कारणही आलं समोर

डिझेलची टंचाई असल्याने लासलगाव बाजार समिती येथील व्यापारी संघाने समितीला पत्र दिले आहे. इंधनाची टंचाई तीव्र स्वरूप धारण करीत आहे. या संदर्भात शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. अन्यथा व्यापारी संकटात येतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com