Chhagan Bhujbal News : संभाजी भिडे यांचे नाव मनोहर कुलकर्णी आहे की नाही?

Chhagan Bhujbal clears his orignal stand on Mahatma Phule-छगन भुजबळ म्हणाले, शिंदे- फडणवीस सरकारमध्ये गेलो, म्हणून मी माझी भूमिका बदलणार नाही.
Chhagan Bhujbal & Sambhaji Bhide
Chhagan Bhujbal & Sambhaji BhideSarkarnama

Nashik News : संभाजी भिडे यांचे नाव मनोहर कुलकर्णी आहे की नाही, हे स्पष्ट करावे. ते जर मनोहर कुलकर्णी आहे, तर संभाजी नाव घेण्याची आवश्यकता का भासली? असा परखड सवाल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. (Chhagan Bhujbal criticized New generation on Education)

मंत्री भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) काल (Nashik) वृत्तवाहिन्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण शिंदे-फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारमध्ये सहभागी झालो, याचा अर्थ मी माझी भूमिका बदलली असा होत नाही.

Chhagan Bhujbal & Sambhaji Bhide
Nashik News : कांद्याची स्थिती टोमॅटोसारखी होऊ नये, म्हणून निर्यात शुल्क लावले!

यावेळी त्यांनी संभाजी भिडे प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, संभाजी भिडे यांचे नाव मनोहर कुलकर्णी आहे. मग त्यांनी संभाजी हे नाव का लावले? हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. हे नाव घ्यायचं आणि बहुजन समाजात जायचं हे योग्य नाही.

संभाजी भिडे काय काय करतात, ते कोणत्या विचारांचा प्रसार करतात, हे तुम्हाला व सगळ्यांना माहीत आहे. त्यांचे हे असं असेल, तर आम्ही त्याला विरोध करणार. मी ज्या जातीत जन्माला आलो, त्या जातीत शिवाजी, संभाजी, धनाजी अशी सगळी नावे आहेत. जे कोणी लोकं संभाजी भिडे यांची बाजू घेतात, त्यांनी स्वतः याबाबत स्पष्टीकरण द्यावं, असे आव्हान भुजबळ यांनी दिले.

Chhagan Bhujbal & Sambhaji Bhide
BJP News : भाजपने पुन्हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले!

मी सध्या शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झालो आहे. याचा अर्थ मी माझी मुळ भूमिका बदलली असे कोणीही समजू नये. आपल्याला शिक्षणाची कवाडे सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, फतिमाबी, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींनी खुली केली. त्यामुळे ज्यांनी कोणाला शिकवलेच नाही, त्यांचे फोटो लावण्याचे काय प्रयोजन?. याचा जरूर विचार झाला पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com