सहकाऱ्यांना मागे सोडून पुढे पळणारा मुख्यमंत्री नसावा!

ब्राम्हण मुख्यमंत्री हवा यावर छगन भुजबळ यांचा दानवे, फडणवीसांना लगावला टोला.
Chhagan Bhujbal, NCP Leader
Chhagan Bhujbal, NCP LeaderSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : मुख्यमंत्री (Chief Minister) ब्राम्हण असावा की अन्य कोण हे ज्याचे बहुमत (Majority) असेल त्यावर ठरेल. मात्र सर्वांना बरोबर घेऊन चालणारा मुख्यमंत्री असावा, सहकाऱ्यांना सोडून पुढे पळणारा मुख्यमंत्री नसावा, असा टोला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

Chhagan Bhujbal, NCP Leader
अजित पवारांनी नाशिकच्या भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला!

श्री. भुजबळ नाशिक येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी `मला ब्राम्हण मुख्यमंत्री झालेला पहायचा आहे` असे विधान केले आहे. त्यावर त्यांची प्रतिक्रीया विचारली असता, त्यांनी भाजप नेते दानवे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.

Chhagan Bhujbal, NCP Leader
राजमाता कल्पनाराजे भोसलेंनी दिली नरहरी झिरवाळांना कौतुकाची थाप!

श्री. भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री ब्राम्हण असावा, दलीत असावा की ओबीसी असावा, की मराठा की आणखी कोणी हे ज्याच्याकडे बहुमत असेल त्यावर ठरेल. मात्र पुरोगामी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी जो रोडमॅप घालून दिलेला आहे, त्यावर चालणारा असावा. यशवंतराव चव्हाण यांनी जे आदर्श घालून दिलेत त्यानुसार वसंतदादा पाटील, शरद पवार यांनी पुढे काम केले. गोरगरीब जनतेच्या प्रश्नांचा विचार करणारा मुख्यमंत्री असावा. त्याने जनतेची काळजी केली पाहिजे.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. त्यात अनेक चांगल्या वैचारीक परंपरा आहेत. छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मुख्यमंत्री असावा असे मला वाटते.

पाणी टंचाई गंभीर

श्री. भुजबळ यांनी राज्यात उन्हाळा तीव्र आहे. अनेक भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. माझा मतदारसंघ येवल्यातही अडचणी आहेत. शेतीलाही आवर्तन हवे आहे. यासंदर्भात शासनाने जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. गरज पडेल तीथे टँकरने पुरवठा केला जाईल. पाणी जपुन वापरून त्याचे नियोजन आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या आहेत.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com