Chhagan Bhujbal : ना आडपडदा..ना भीती! बेधडक भुजबळांच्या निशाण्यावर थेट अजित पवार; म्हणाले,'कसला वादा अन् कसला दादा...'

NCP Politics On Cabinet Expansion : 'काही लोकांनी मला मंत्री केलं नाही, म्हणून अजितदादांना धन्यवाद दिले.पण मंत्रिपद अनेकदा मिळाली, त्यामुळे आता नाही भेटलं त्यात काही वाद नाही.1999 साली जर काँग्रेस एकत्र असती तर मी 100 टक्के मुख्यमंत्री झालो असतो...'
Chhagan Bhujbal, Ajit Pawar
Chhagan Bhujbal, Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Yeola News : महायुतीला एवढं प्रचंड मोठं बहुमत मिळूनही आता नाराजीनाट्यानं त्यांचं यश कुठेतरी झाकोळत चाललं असल्याचं दिसून येत आहे.सुरुवातीला मुख्यमंत्रिपदावरुन रुसवे-फुगवे, खातेवाटपासाठी रस्सीखेच,नंतर मंत्रिमंडळासाठी तारीख पे तारीख,आणि आता मंत्रिमंडळ विस्तारावरुन नाराजीनाट्य असा सगळा गोंधळ महायुतीत सुरू आहे. यातच मंत्रिमंडळ विस्तार झाला, मात्र नव्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा पत्ता कट झाला आहे,यावरून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

वरिष्ठ आणि अनुभवी नेत्यांचाच सरकारमधून पत्ता कट झाल्यानं महायुतीत प्रचंड खदखद बाहेर पडत आहे. त्यात राष्ट्रवादीनं अनपेक्षित पण मोठा झटका देताना थेट छगन भुजबळांनाच मंत्रिमंडळापासून दूर ठेवले. यानंतर संतापलेल्या भुजबळांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवरच (Ajit Pawar) टीकेच्या तोफ डागत राजकीय वातावरण चांगलंच तापवलं आहे.

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मंगळवारी (ता.17) येवला दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्ते,पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. त्यांनी आता मंत्रि‍पदासाठी तोंडसुख घेतल्यानंतर पक्षाच्या नेत्यांवर संताप व्यक्त केला आहे.

छगन भुजबळ यांनी आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच धारेवर धरले आहे.ते म्हणाले,प्रत्येकाला मंत्रिपद हवं असते. प्रश्न मंत्रिपदाचा नाही, ज्याप्रकारे अवहेलना करण्यात आली,त्याचा आहे. मला मंत्रिपद कोणी नाकारलं, हे शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोणी नाकारलं हे शोधावं लागेल, असंही भुजबळांनी यावेळी सांगितले.

माजी मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन आपली बाजू मांडली. यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. छगन भुजबळ यांनी अजितदादांवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले,साताऱ्याची जागा आम्ही भाजपला सोडली म्हणून एक राज्यसभा आम्हाला मिळाली होती. अजितदादांनी शब्द दिला म्हणजे काय? काही चर्चा आहे की नाही.शरद पवारसाहेब सुद्धा चर्चा करून निर्णय घ्यायचे असा टोलाही भुजबळांनीही यावेळी अजित पवारांना लगावला.

तसेच आठ दिवसांपूर्वीच समीर भुजबळांना पटेल यांनी बोलावून घेतलं आणि सांगितलं की,मला राज्यसभेवर पाठवू. मकरंद पाटील यांना मंत्री करण्यासाठी मला राज्यसभेवर पाठवायचं? मी काय मूर्ख आहे का? इतरांना दिलेला शब्द पाळण्यासाठी भुजबळांचा बळी घेणार का? मी काही लल्लू-पंजू आहे का? चर्चा सुद्धा नाही केली की कोण मंत्री होणार? माझी जर किंमत नाही तर मी काय करायला पाहिजे,तुम्ही शब्द दिला म्हणजे काहीही करायचं का? काय तर म्हणे दादाचा वादा, अशी खोचक टिप्पणीही भुजबळ यांनी केली.

भुजबळांनी आपल्या राजकीय कारकीर्दीचा आलेखच मांडत अजितदादांना घेरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, काही लोकांनी मला मंत्री केलं नाही, म्हणून अजितदादांना धन्यवाद दिले.पण मंत्रिपद अनेकदा मिळाली, त्यामुळे आता नाही भेटलं त्यात काही वाद नाही.1999 साली जर काँग्रेस एकत्र असती तर मी 100 टक्के मुख्यमंत्री झालो असतो, मला सोनिया गांधींपासून अनेकांचे फोन होते की, तुम्ही काँग्रेस सोडू नका तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहोत. पण मी शरद पवारांसोबत गेलो, असा गौप्यस्फोटही भुजबळांनी यावेळी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com