Chhagan Bhujbal : मराठ्यांना भिडले, आता मोठ्या हालचालींनी भुजबळ फार्म चर्चेत, नेमकं घडतंय काय?

Chhagan Bhujbal, Maratha reservation : मराठा आरक्षणासंदर्भात भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेने तणाव वाढला आहे. नाशिकमध्ये भुजबळांच्या निवासस्थानी भुजबळ फार्म परिसराच घडामोडींनी वेग घेतला आहे.
Chhagan Bhujbal |Manoj Jarange Patil
Chhagan Bhujbal |Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal : मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्याने अन्न व नागरी पुरवठामंत्री, तसेच ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्य शासनाने मराठा आरक्षणाच्या काढलेल्या जीआर वर भुजबळांनी आक्षेप घेतला आहे. भुजबळ यांनी व्यक्त केलेल्या या भूमिकेनंतर नाशिकमध्ये भुजबळ फार्मबाहेर मोठ्या घडामोडी घडत असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास भुजबळांचा सुरुवातीपासून विरोध आहे. हैदराबाद गॅजेटच्या अमंलबजावणीच्या निर्णयामुळे ओबीसींच्या ताटातील भाकरी नक्कीच कमी होणार असून ओबीसींचे नुकसान होणार असल्याचे भुजबळांनी म्हटले आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून वाटा देण्यास भुजबळांनी उघड विरोध दर्शवल्यानंतर त्यांच्या फार्महाउसवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच गस्तीपथकांकडून दिवस-रात्र कडेकोट निगराणी ठेवली जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषणाचं हत्यार उपासल्याने राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला. त्यातून तणावाचे वातावरण निर्माण झाले. ते पाहाता शासनाने आरक्षणासंदर्भात जीआर काढला व त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यातून ओबीसी व मराठा नेत्यांमधील संघर्ष पुन्हा उफाळला. सुरुवातीपासूनच भुजबळांचा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास तीव्र विरोध आहे. त्यात आता भुजबळांनी सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी न्यायालयात धाव घेण्याची तयारी केल्याने तणाव अधिकच वाढला आहे.

Chhagan Bhujbal |Manoj Jarange Patil
Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळ म्हणतात, मराठा समाजाला ओबीसी घटकांत आरक्षण दिल्यास वीस टक्के नोकऱ्या घटणार!

मराठा आरक्षणाला विरोध केल्याने मंत्री भुजबळ यांना यापूर्वी अनेकदा धमक्या मिळाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार भुजबळ फार्म येथे पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दिवस-रात्र दोन पथकांमध्ये १ अधिकारी आणि १२ अंमलदार अशी सुरक्षा अंबड पोलिस ठाण्याच्या अंतर्गत ठेवण्यात आली आहे. त्याशिवाय गस्तीपथके सतत निगराणी करत आहेत.

Chhagan Bhujbal |Manoj Jarange Patil
Narayan Rane : आरक्षणावरुन मराठा-ओबीसी वाद टोकाला; राणेंना झाली थेट शिवाजी महाराजांची आठवण, म्हणाले...

दरम्यान भुजबळ मंत्री असल्याने त्यांचे इतरही जिल्ह्यात व तालुक्यांत सातत्याने दौरे होत असतात. त्यादृष्टीने ज्या जिल्ह्यात भुजबळ यांचा दौरा असेल त्या जिल्ह्यात स्थानिक पोलिसांकडूनही अतिरिक्त सुरक्षा पुरविली जात आहे. आरक्षणावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी सतर्कता वाढविली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com