Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळ यांनी सांगितला नाशिकच्या विकासाचा नवा मंत्र, म्हणाले...

Chhagan Bhujbal; Minister Chhagan Bhujbal said, Nashik shall be devolop as medical tourism hub in Future-नाशिक हे मेडिकल टुरिझम हब म्हणून विकसित करण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News: नाशिक शहराच्या विकासाबाबत विविध दृष्टीकोण सांगितले जातात. नाशिक शहर हे आगामी काळात माहिती तंत्रज्ञान (आय.टी.) हब असे प्रयत्न देखील होत आहेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या शहराच्या विकासासाठी एक नवा पर्याय सांगितला आहे.

नाशिक जिल्हा शिक्षण, शेती, उद्योग, पर्यटन क्षेत्रात अग्रेसर आहे, त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातदेखील आपला जिल्हा दिवसेंदिवस प्रगती करत आहे. आज नाशिकमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ट्रॉमा सेंटर, नविन वैद्यकीय महाविद्यालये आणि ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे हळूहळू सक्षम केली जात आहेत. त्यादृष्टीने मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत वैद्यकीय तंज्ञांना आवाहन केले आहे.

नाशिकच्या विकासात शल्यचिकित्सकांचा सक्रीय सहभाग महत्त्वाचा आहे. नाशिक हे मेडिकल टुरिझम हब म्हणून विकसित करण्यास प्राधान्य आहे. देशात काही राज्यांत असे प्रयोग झालेत. ते यशस्वी देखील झाले असून त्याचा उपयोग राज्याच्या विकासाला होत आहे. महाराष्ट्रात त्याचे अनुकरण झाले पाहिजे.

Chhagan Bhujbal
Raj Thackrey Politics: राज, उद्धव ठाकरे युतीबाबतच्या अनिश्चिततेवर मनसेच्या नाशिक अधिवेशनात तरी होणार का फैसला?

नाशिक शल्यचिकित्सक संस्थेच्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन मंत्री छगन भुजबळ यांनी केले. यावेळी असोसिएशन ॲाफ सर्जन्स ॲाफ इंडियाचे अध्यक्ष डॅा. प्रविण सुर्यवंशी, महाराष्ट्र स्टेट सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॅा. महेश मालु, नाशिक सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॅा. नागेश मदनूरकर यांसह वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी हजेरी लावली.

महाराष्ट्र शासनाने आरोग्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामाध्यमातून राज्यातील सामान्य जनतेला उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी शासन अनेक उपक्रम राबवित आहे. त्याचा विस्तार झाल्यास विकासाला देखील चालना मिळेल.

या सर्व उपक्रमांच्या अंमलबजावणीत शल्यचिकित्सकांचा सहभाग जितका जास्त असेल, तितकेच हे उपक्रम यशस्वी होऊ शकेल. समृध्दीययय महामार्गावर शल्यचिकित्सक सोसायटीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना आवश्यक ती मदत शासन स्तरावरून उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्याने याचा प्रचार प्रसार होण्यासाठी अशा परिषदा नियमित होणे आवश्यक आहे. एक शल्यचिकित्सक ऑपरेशन थिएटरमध्ये असतो तेव्हा तो केवळ औषधांचा उपयोग करीत नसतो, तर तो विज्ञान, अनुभव आणि धैर्य यांचा संगम साकारत असतो. समाजाच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करताना शल्यचिकित्सकांची भूमिका अत्यंत मोलाची ठरेल.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com