Raj Thackrey Politics: राज, उद्धव ठाकरे युतीबाबतच्या अनिश्चिततेवर मनसेच्या नाशिक अधिवेशनात तरी होणार का फैसला?

Raj Thackrey; Will the Thackeray brothers come together or not? MNS brainstorming will take place in Igatpuri amid uncertainty -आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचे राज्यातील पदाधिकाऱ्यांचे इगतपुरी (नाशिक) येथे तीन दिवसीय अधिवेशन
Uddhav-Thackrey-Raj-Thackerey
Uddhav-Thackrey-Raj-ThackereySarkarnama
Published on
Updated on

Raj Thackrey News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय सहकार्य हा राज्यातील सर्वात मोठा विषय आहे. या युतीची महायुती सरकारने ही गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे या युतीबाबत मराठी मतदारांनाही उत्सुकता आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पाच जुलैला मराठी भाषेच्या विषयावर संयुक्त मेळावा झाला. त्यानंतर या दोन्ही भावांच्या राजकीय मनोमिलनाबाबत पुढे काय? याची उत्सुकता आणखी वाढली आहे. उद्या तरी हे दोघे एकत्र येऊ नये म्हणून सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्याशी सहानुभूती असलेले अनेक घटक काम करीत आहेत

या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत येत्या १४ ते १६ जुलै दरम्यान इगतपुरी येथे पक्षाचे तीन दिवसीय अधिवेशन होत आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा त्याचा विषय आहे. मात्र राज्यातील निवडक पदाधिकारी आणि पक्षप्रमुख राज ठाकरे यांची या मेळाव्याला विशेष उपस्थिती असेल. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती हा विषय त्यात चर्चेला असेल, हे नक्की.

Uddhav-Thackrey-Raj-Thackerey
Narhari Zirwal Politics: आदिवासी आंदोलन चिघळले... मंत्री नरहरी झिरवाळ करताहेत धावपळ, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके गेले तरी कुठे?

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन वर्षे लांबल्या. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळविले. त्यात विरोधी महाविकास आघाडी कमकुवत झाल्याचे चित्र आहे. त्याचा फायदा घेऊन शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला आणखी कमकुवत करण्याचे जोरदार प्रयत्न झाले.

त्याचा फायदा महायुतीला होणार, अशी एकतर्फी चर्चा राज्यात सुरू होती. या चर्चेला ठाकरे बंधू एकत्र येणार या बातमीने ब्रेक लागला. महायुतीनेही मनसे आणि शिवसेना युतीचा धसका घेतल्याचे लपून राहिलेले नाही. मात्र ही युती होणार की नाही यावर ठोस निर्णय आणि घोषणा गुलदस्त्यातच आहे.

नाशिक येथे होणाऱ्या तीन दिवसीय मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार की नाही याबाबत चर्चा होईल, हे कळते. मनसे आणि नाशिक यांचे राजकीय नाते अतिशय कनिष्ठ आहे. मनसेचे काही महत्त्वाचे निर्णय नाशिक शहरातच झाल्याचा इतिहास आहे. पार्श्वभूमीवर आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची नवी राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी मनसे काय निर्णय घेतो याची उत्सुकता वाढली आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com