Chhagan Bhujbal Politics: पालकमंत्री विषय निघताच, मिश्किल भुजबळ म्हणाले, ‘मी तर नाशिकचा बालक, पालक कशाला हवा’

Chhagan Bhujbal;Minister Chhagan Bhujbal said, "Why should I be the guardian of a child from Nashik?"-अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाशिक मध्ये झाले उत्साही स्वागत.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे आज नाशिकला आगमन झाले. यावेळी समर्थकांनी त्यांचे ठिकठिकाणी उत्साही स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे झालेल्या स्वागताला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी भुजबळ समर्थकांनी मोठा जल्लोष केला.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते म्हणाले, मंत्री झालो म्हणजे कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी झालो. त्या संधीचा उपयोग मी राज्याच्या आणि नागरिकांच्या समस्या निवारणासाठीच करणार आहे. आजवर मी सतत गोरगरीब आणि जनतेच्या प्रश्नांसाठी झटत आलो आहे लोकांची काम करत आलो आहे. त्यामुळे नाशिकला येताना ठिकठिकाणी अनेक लोक स्वागताला आलेले दिसले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही संधी दिली आहे. राज्यात फुले-शाहू- आंबेडकरांच्या विचाराचे राज्य सुरू आहे. शाहू आंबेडकरांचे राज्य म्हणजे स्त्री- पुरुष, गरीब-श्रीमंत किंवा हिंदू, मुस्लिम, दलित गरीब अशा सर्व जनतेला समान संधी. समान वागणूक असा आहे. काम करताना कोणाशीही भेदभाव केला जाणार नाही.

Chhagan Bhujbal
Eknath Shinde politics: शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने तिरंगा रॅलीतून मारले एका दगडात दोन पक्षी, विरोधकांनाही दिला संदेश!

यावेळी पालकमंत्रीपदाचा विषय काही कार्यकर्त्यांनी काढला. यावेळी ते म्हणाले, माझा जन्म नाशिकचा आहे. याच शहरात माझे बालपण गेले आहे. मी नाशिकचा बालक आहे. पालक कशाला हवा? असा मिश्किल प्रतीप्रश्न त्यांनी केला. आपल्या गावाची, पुढच्या पिढीची योग्य व्यवस्था करणे ही बालकाची जबाबदारी असते. त्यावर उपस्थित त्यांनीही मनमुराद हसत टाळ्यांचा प्रतिसाद दिला.

Chhagan Bhujbal
Dhule Cash Controversy: पाच कोटींची रोकड; अधिकारी चार तास उशिरा का पोहोचले?... हे आहे गुपित!

यावेळी सिंहस्थ कुंभमेळा आणि विकासाचा प्रश्नही निघाला. भुजबळ म्हणाले, गेल्या सिंहास्थ कुंभमेळ्यात तसेच आजवर काम करताना शहरासाठी अनेक सुविधा केल्या आहेत. शहराच्या चहुबाजूने बाह्य रिंग रोड बांधले आहेत. कोणालाही शहरात न येता पुणे, मुंबई, इंदूर, औरंगाबाद कुठेही जाता येईल, असे रोड उपलब्ध आहेत. त्यामुळे आता सिंहस्थ तोंडावर आहे. त्या दृष्टीने आवश्यक विचार करावा लागेल.

कुंभमेळ्यासाठी दहा हजार कोटी, पंधरा हजार कोटी असे विकास आराखडे जाहीर करून उपयोग होणार नाही. त्याला ज्याची आवश्यकता आहे, तातडीचा प्रश्न आहे. त्यावर काम केले पाहिजे. शासनाला गतिमान करावे लागेल. शहराच्या विकासाला त्यातूनच चालना मिळेल, असा टोलाही त्यांनी प्रशासनाला लगावला.

यावेळी आमदार हिरामण खोसकर. जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला आघाडीच्या प्रेरणा बलकवडे, अंबादास खैरे यांसह विविध पदाधिकारी भुजबळ यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या कार्यक्रमानंतर भुजबळ आपल्या मतदारसंघात येवला शहरात रवाना झाले. त्यानिमित्त शहरभर स्वागताचे फ्लेक्स लावण्यात आले होते.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com