Dhule Cash Controversy: पाच कोटींची रोकड; अधिकारी चार तास उशिरा का पोहोचले?... हे आहे गुपित!

5 Crore Cash Seized :आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकांच्या कक्षात सापडली पाच कोटींची रोकड.
Anil Gote & Arjun Khotkar
Anil Gote & Arjun KhotkarSarkarnama
Published on
Updated on

Arjun Khotkar News: विधिमंडळ अंदाज समिती बुधवारी धुळे दौऱ्यावर होती. या समितीचे कारणामे आणि विश्रामगृहावर सापडलेली पाच कोटींची रोकड हा नवा राजकीय वाद ठरणार आहे. यामध्ये आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने उडी घेतली आहे.

बुधवारी दिवसभर धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहाची खोली क्रमांक १०२ चर्चेत आहे. ही खोली १५ मे पासून अंदाज समितीचे प्रमुख आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावावर आरक्षित होती. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी येथे तळ ठोकला होता.

विधिमंडळ अंदाज समिती आणि तिचे कामकाज हा गेली अनेक वर्षवादाचा आणि चर्चेचा विषय आहे. समितीने दिलेल्या अहवालावर विधिमंडळात चर्चा होत असते. संवैधानिक संदर्भ जोडले गेले आहेत. या समितीच्या पाहणीत एखाद्या कामाला चांगली शिफारस झाली की अधिकाऱ्यांचा आणि कंत्राटदाराचा जीव भांड्यात पडतो.

Anil Gote & Arjun Khotkar
Dhule Cash Controversy: संजय राऊत यांनी फोडला बॉम्ब, ‘अर्जुन खोतकरांसाठी १५ कोटी जमा होणार होते’

त्यामुळे अंदाज समितीचा दौरा आणि दौऱ्यातील सदस्यांची सरबराई यामध्ये फारसे नाविन्य राहिलेले नाही. याबाबतच्या अनेक खुमाहदार चर्चा आणि बातम्या यापूर्वी देखील बाहेर पडल्या आहेत. यापूर्वी नाशिक, जळगाव, जालना आदी दौरे वादाचा विषय ठरले आहेत. यंदा मात्र धुळे विश्रामगृहात या सर्व प्रकारांत मुरलेले माजी आमदार अनिल गोटे यांची एन्ट्री सगळ्यांनाच महागात पडली आहे.

Anil Gote & Arjun Khotkar
Cash Controversy : एकनाथ शिंदेंच्या आमदाराच्या पीएच्या खोलीत सापडले पैशांचे घबाड, अनिल गोटेंकडून वस्त्रहरण!

अंदाज समितीतील प्रत्येक सदस्याला "तीर्थप्रसाद" देण्याचा प्रघात आहे. हा सर्व पाहुणचार आणि सर्व राही करण्याची जबाबदारी अर्थातच जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनावर असते. विश्रामगृहात सापडलेली रोकड अर्थातच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वर्गणी काढून जमा केली असल्याचे बोलले जाते.

यासंदर्भात माजी आमदार अनिल गोटे यांनी कक्ष क्रमांक 102 येथे सकाळपासून पहारा ठेवला होता. सायंकाळी ते स्वतः येथे येऊन बसले. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले. मात्र चार ते पाच तास कोणीही तिकडे फिरकले नाही. त्याचे मुख्य कारण यामध्ये जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांचा थेट सहभाग लपून राहिलेला नाही.

हा प्रकार घडल्यावर भरपूर धावपळ झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत बातम्या नक्कीच पोहोचल्या आहेत. दौऱ्यावर आलेल्या अंदाज समितीचे प्रमुख शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार अर्जुन खोतकर आहेत. या समितीचे सदस्य असलेले अन्य आमदार या प्रकाराने चांगलेच धास्तावले आहे. त्यातील काही आमदारांच्या प्रतिनिधींनी यातील पैसे घेतल्याचा आरोप आहे.

पैसे सापडले तो कक्ष आणि तिथे उपस्थिती त्यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांची होती. त्यामुळे ही समिती आणि आमदार खोतकर यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत. हे प्रकरण दडपण्यासाठी आता सगळीच यंत्रणा सक्रिय झाली आहे. मात्र राजकीय वाद म्हणून हा विषय आणखी काही दिवस सुरूच राहील असे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com