Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

Chhagan Bhujbal Politics: ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी न्यायालयीन आणि रस्त्यावरील दोन्ही लढाया लढू!

Chhagan Bhujbal: OBC contraversy; छगन भुजबळ यांनी विविध नेत्यांसह ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या लातूर येथील भरत कराड यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
Published on

Chhagan Bhujbal News: मराठा आणि ओबीसी आरक्षण समर्थकांतील राजकीय वाद चिघळत चालला आहे. लातूर येथील भरत कराड कार्यकर्त्याने या प्रश्नावर आत्महत्या केली. त्यामुळे ओबीसी नेते, मंत्री एकवटू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आपण लढत आहोत. न्यायव्यवस्थेवर आपला पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे आरक्षण टिकवण्यासाठी आपण न्यायालयीन आणि प्रसंगी रस्त्यावरील दोन्ही लढाया देखील लढू. कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

यावेळी माजी मंत्री धनंजय मुंढे, आमदार रमेश कराड, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे, ॲड. सुभाष राऊत, सरपंच विजय गंभिरे यांसह पदाधिकारी आणि ओबीसी संघटनांचे नेते दौऱ्यावेळी उपस्थित होते.

Chhagan Bhujbal
Nashik News: फिरत्या आरक्षणातही सर्वसाधारण अध्यक्षांचेच वर्चस्व! कुठल्या समाजाला किती वेळा मिळाली संधी? जाणून घ्या

लातूर येथीव भरत महादेव कराड या तरूणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या भितीमुळे नैराश्यातून जीवन संपवलं. या घटनेने राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी विविध नेत्यांसह कराड कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

यावेळी भरत कराड यांच्या कुटुंबियांना धीर दिला. त्यांना आर्थिक मदत कुटुंबियांना सुपूर्त केली. यावेळी उपस्थितांशी चर्चा केली. भरत कराड यांनी ओबीसींचा ध्यास घेतलेला होता. जिथे जिथे ओबीसीच्या सभा व मेळावे असायच्या तिथ तिथं ते जात होते, असे त्यांनी सांगितले.

ओबीसी समाजच आरक्षण कमी होता कामे नये, ही त्यांची भावना होती. ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. गरीब ओबीसींच्या ताटात वाटेकरी नको असे त्याला वाटायचे. मात्र कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे भुजबळ म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांप्रमाणे लढा द्या. या देशात आणि राज्यात लोकशाही आहे. इथे कोणाचीही दादागिरी चालणार नाही. सर्व अठरा पगड जातींनी एकत्र रहा, एकजूट ठेवा. ओबीसींच आरक्षण टिकवण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहोत.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com