Arvind Jadhav

पुणे विद्यापीठाची पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशनची पदवी नाशिकमधून घेतली अन कामाची जबाबदारी खांद्यावर आली. ईटीव्ही मराठी, सकाळ, लोकमत असा थोडा थोडा अनुभवांचा प्रवास केला. २०११ मध्ये मात्र नाशिकच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये काम सुरू केले. तब्बल एक तप एका संस्थेत गेले. रिपोर्टींग आवडीचे असल्याने डेस्कची संधी दूरच राहिली. आता १ जानेवारी २०२४ पासून सकाळ समुहाच्या सरकारनामा या वेब पोर्टलमध्ये काम सुरू केले. साचेबंद कामाने विचारशक्ती संपते. कोणतेही काम वाहत्या पाण्याप्रमाणे निरंतर आणि नवनवीन अनुभव सोबत घेऊन करीत गेले की आंनद द्विगुणीत होतो. जबाबदारीचे ओझे वाटत नाही. सुदैवाने असे अनुभव आता डिजीटल माध्यमांच्या वेगामुळे आणि वाचकांच्या सतत बदलणाऱ्या रूचीमुळे आणखी समृद्ध होतील.
Connect:
Arvind Jadhav
Read more
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com