परदेशातील वाढत्या कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्क व्हा!

येवल्यात आढावा बैठकीत पहिल्या डोसचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

येवला : परदेशातील वाढत्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असून, सर्वप्रथम पहिल्या डोसचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यात यावे, तालुक्यात एकूण ८८, तर येवला शहरात ५४ टक्के लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याबरोबरच लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरण पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केल्या.

Chhagan Bhujbal
यंदाची दिवाळी सायकलवर...पेट्रोल-डिझेल शंभरी पार, ये क्या हो गया मोदी सरकार!

येवला व निफाड तालुक्यांतील कोरोनाची सद्यःस्थिती, उपाययोजना आढावा बैठक संपर्क कार्यालयात झाली. तीत ते बोलत होते. बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, प्रांताधिकारी सोपान कासार, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकासाधिकारी डॉ. उन्मेष देशमुख, सहाय्यक कार्यकारी अभियंता सागर चौधरी, उपअभियंता उमेश पाटील, तालुका आरोग्याधिकारी डॉ. हर्शल नेहेते, डॉ. सुजित कोशिरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जितेंद्र डोंगरे, पोलिस निरीक्षक अनिल भवारी, पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, संपर्क कार्यालयप्रमुख बाळासाहेब लोखंडे, भाऊसाहेब धनवटे, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Chhagan Bhujbal
अच्छे दिन आले... स्वयंपाक चुलीवर अन् लोक जमिनीवर आले!

पालकमंत्री भुजबळ म्हणाले, की परदेशात पुन्हा कोरोनाची लाट वाढत असल्यामुळे अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असून, त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात. साथरोग आटोक्यात आणण्यासाठी स्वच्छतेवर अधिक भर देण्यात यावा. पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून नवीन कामेही सुरू करण्यात यावीत. विकासकामांना अधिक गती देण्यात यावी. नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी अपघात होणार नाहीत, यासाठी अधिक काळजी घेण्यात यावी. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. रस्ते दुरुस्ती करताना अपघात झाले, तर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे ते म्हणाले.

तालुक्यातील खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयीकृत बँका यांचा एकूण लक्षांक एकूण ७५ कोटी होता. या हंगामात लक्षांकाचे उद्दिष्ट पूर्ण होऊन आतापर्यंत एकूण ८४ कोटी पीक कर्जवाटप करण्यात आले असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com