Nashik : मकरसंक्रांतीनिमित्त येवला येथे छगन भुजबळ यांनी पतंग उत्सवाला हजेरी लावली. यावेळी आगामी निवडणुकीच्यादृष्टीने महत्त्वाचे विधान केले. आकाशात झेपावणारे पतंग हे अधिक उंचावर गेले पाहिजे. हे सर्व आपल्यालाच लोकांचे पतंग आहे. हे पतंग कापण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र येणाऱ्या निवडणुकीत जे आपल्या समोर जे विरोधक असतील त्यांचा पतंग या मतदारसंघातील जनतेच्या बळावर नक्कीच कापू, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त करीत पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी उपस्थित नागरिकांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
गेल्या निवडणुकांमध्ये अनेक लोक आपल्याविरोधात उभे राहिले होते. येवल्याच्या जनतेने मात्र त्यांचा दोर कापला आहे. येणाऱ्या निवडणुकीत ज्यांची इच्छा आहे. त्यांनी विरोधात लढावं. मतदारसंघातील जनता त्यांना घरचा रस्ता दाखवतील, असा खोचक टोला छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) विरोधकांना लगावला. तसेच जनतेच्या विश्वासाचा धागा पक्का असल्याने माझा धागा कायम राहणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, माजी विधानसभाध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, शहराध्यक्ष दीपक लोणारी, माजी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, मकरंद सोनवणे, अल्केश कासलीवाल, सुनील पैठणकर, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, सुभाष गांगुर्डे, गोटू मांजरे, सुमित थोरात, विशाल परदेशी, सचिन सोनवणे, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मकरसंक्रांतीच्यानिमित्ताने आज येवला येथील कार्यालयात मंत्री छगन भुजबळ यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तिळगुळवाटप करत मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी चित्रकार संतोष राऊळ यांनी मंत्री छगन भुजबळ यांना त्यांचे चित्र रेखाटलेला पतंग भेट दिला. भुजबळ यांनी कार्यकर्त्यांशी संवाददेखील साधला.
(Edited By Roshan More)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.