Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

Chhagan Bhujbal : संपले संपले म्हटले गेलेले भुजबळ पाचव्यांदा पुन्हा ताकदीने आलेत !

Chhagan Bhujbal’s Remarkable Political Journey : भुजबळांचा राजकीय प्रवास फार मोठा व अत्यंत चढउतारांचा राहिला आहे. भुजबळांच्या राजकीय आयुष्यात आजवर पाच असे टप्पे आले ज्यात प्रत्येक-वेळेला भुजबळ राजकारणातून आता संपले गेल्याचं म्हटलं गेलं.
Published on

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना सुरुवातीला मंत्रिमडळातून डावलण्यात आलं होतं. मंत्रीपदापासून भुजबळांना दूर ठेवलं गेलं त्यावेळी भुजबळांचे राजकारण आता संपलं आहे असं म्हटलं गेलं. पण संपले संपले म्हटले गेलेले भुजबळ पुन्हा ताकदीने उभे राहिले. त्यांनी संघर्ष केला पण सगळ्यांना झुकवलं. महायुती सरकारला मंत्रिमंडळात समावेश करुन घ्यायला त्यांनी भाग पाडलं. त्यामुळे भुजबळांचे आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळात कमबॅक झाले आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात अन्न व नागरी पुरवठा खात्याचा पदभार त्यांनी स्वीकारला आहे.

पण, भुजबळांच्या आयुष्यात हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही. भुजबळांचा राजकीय प्रवास फार मोठा व अत्यंत चढउतारांचा राहिला आहे. भुजबळांच्या राजकीय आयुष्यात आजवर पाच असे टप्पे आले ज्यात प्रत्येकवेळेला भुजबळ राजकारणातून आता संपले गेल्याचं म्हटलं गेलं. पण प्रत्येक वेळेला संपले संपले म्हटले गेलेल्या भुजबळांनी जोरदार कमबॅक केलं.

छगन भुजबळ शिवसेनेत बंड करून बाहेर पडले, त्यावेळेला भुजबळांनी शिवसैनिकांचा रोष ओढावून घेतला होता. त्यावेळी भुजबळांच्या बंगल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला होता. त्यावेळी भुजबळांना सतत चोवीस तास पोलीस संरक्षण देण्यात आले होतं. तेव्हा त्यांना बाहेर फिरणेही अवघड झाले होते. संतापलेल्या बाळासाहेबांनी त्यावेळी लखोबा लोखंडे असं भुजबळाचं नामकरण केलं होतं. बाळासाहेबांच्या विरोधात जाऊन बंड करणं ही काही साधी गोष्ट नव्हती. बाळासाहेबांशी गद्दारी केलेल्या भुजबळांचे राजकारणही आता संपेल असं वाटत होतं त्यावेळी शरद पवार यांनी भुजबळांना ताकद दिली. पवारांनी भुजबळांना मंत्री केलं.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : ज्यांनी तुरुंगात टाकलं त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले, काय वाटतं? भुजबळांनी दिलं उत्तर...

त्यानंतर भुजबळांच्या आयुष्यात असाच कठीण टप्पा आला. 1995 साली माझगावमधून छगन भुजबळ निवडणूक हरले होते. त्यावेळी शिवसेना फोडल्यामुळे शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली होती. म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांना भुजबळांच्या विरोधात उमेदवारी दिली. त्यावेळी नांदगावकर महापालिकेचे नगरसेवक म्हणून काम करत होते. माझगाव हा छगन भुजबळांचा पारंपरिक मतदारसंघ होता. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत बाळा नांदगावकर विजेता ठरले होते. बाळा नांदगावकर या एका साध्या शिवसैनिकाने भुजबळांना पाडले. त्यानंतरही छगन भुजबळ आता संपले अशी चर्चा झाली. पण त्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले. पुन्हा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते झाले.

तेलगी घोटाळा उघडकीस आला तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार होते. त्यावेळी छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देखील होते. याप्रकरणी संशयाची सुई भुजबळांकडेही वळल्याने त्यावेळी शरद पवार यांनी भुजबळांचा राजीनामा घेतला होता. त्यानंतर भुजबळांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लागला होता. तेलगीच्या निमित्ताने आपले राजकीय करिअर संपविण्याचा प्रयत्न झाल्याची खदखद भुजबळ बोलून दाखवत होते. पण त्यातूनही ते सुखरुप बाहेर पडले. भुजबळांचा या प्रकरणात काहीही संबंध नसल्याचे सिद्ध झाल्यावर शरद पवारांनी त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : दराडे शिंदे गटात गेल्याने ठाकरेंना फटका, भुजबळांना फायदा; येवल्यातील गणित बदललं..

महाराष्ट्र सदनाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणातही काहीसे असेच घडले. यावेळेला तर भुजबळांना तुरुंगात जावे लागले होते. वेगवेगळे आरोप भुजबळांवर झाले. त्यानंतर छगन भुजबळ यांना तब्बल 2 वर्षानंतर जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यावेळीही दोन वर्ष तुरुंगात काढलेल्या भुजबळांचे राजकीय करिअर आता संपले असे वाटत होते. पण, तुरुंगातून बाहेर आलेले छगन भुजबळ याहीवेळेला काही दिवसांतच पु्न्हा मंत्री झाले.

आताही राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या भुजबळांना अजित पवारांनीच मंत्रिपदापासून दूर ठेवलं. त्यावर भुजबळांनी अनेकदा आपली नाराजी बोलून दाखवली. पक्ष सोडण्याचा इशाराही दिला. पण, जेष्ठ असतानाही भुजबळांना जाणिवपूर्वक डावलण्यात आलं होतं. भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्याची पक्षाचीच इच्छा नव्हती. त्यामुळे भुजबळ आता संपले असच वाटत होतं. पण पुन्हा भुजबळांनी अजित पवारांच्या मनात नसतानाही फडणवीस यांना जवळ करुन मंत्रिपदाची माळ गळ्यात पाडून घेतली. राष्ट्रवादीत राहुनच भुजबळांनी ही किमया केली. संपले संपले म्हटले गेलेले भुजबळ याहीवेळेला पाचव्यांदा पुन्हा ताकदीने आलेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com