Chhagan Bhujbal : अंगणवाडी उदघाटनाला न बोलावल्याने मंत्र्याचा जळफळाट, धाडली नोटीस

Chhagan Bhujbal Notice to Sarpanch : अंगणवाडी आणि शेडच्या उद्घाटनाला न बोलवल्याने मंत्री भुजबळ नाराज. नांदूर मधमेश्वर निफाड येथील एका लहानशा अंगणवाडी आणि शेडच्या बांधकामाचे उद्घाटन चांगले चर्चेत आले आहे
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News : नांदूर मधमेश्वर निफाड येथील एका लहानशा अंगणवाडी आणि शेडच्या बांधकामाचे उद्घाटन चांगले चर्चेत आले आहे. या समारंभाच्या कोनशिलेवर नाव नसल्याने एक मंत्री चांगलेच नाराज झाले आहेत. या संदर्भात सरपंच आणि इतर नेत्यांनी विरोधात थेट विधानसभा अध्यक्षांपर्यंत तक्रार करण्यात आली आहे. याविषयीची तक्रार करणारे मंत्री दुसरे कोणी नव्हे तर सातत्याने चर्चेत असणारे आणि बातम्यांमध्ये स्थान मिळविणारे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आहेत.

निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर हे गाव मंत्री भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात येते. मात्र राजकीय दृष्ट्या या गावातील मतदारांचा कल भुजबळ यांच्या बाजूने नसतो, असे बोलले जाते. येतील अंगणवाडीची इमारत आणि अन्य छोट्या शेडच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून मोठे राजकारण घडले आहे. जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुरेखा दराडे, सरपंच गायत्री इकडे, उपसरपंच हिराबाई खुरासने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे यांचा अन्य अधिकाऱ्यांना विशेष अधिकार भंग केल्याची तक्रार मंत्री भुजबळ यांनी केली आहे.

Chhagan Bhujbal
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा सुहास कांदेंना ग्रीन सिग्नल, भुजबळांचे काय?

याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे देखील तक्रार करण्यात आली आहे. विधानसभेचे अध्यक्षांना नियम २७३ अन्वये एक ऑगस्ट रोजी याबाबत पत्र लिहिण्यात आले आहे. त्यामुळे एका छोट्या अंगणवाडीच्या उद्घाटनावरून मोठे राजकीय मानापमान नाट्य रंगले आहे. अंगणवाडी इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या कोनशिलेवर स्थानिक विधानसभा सदस्य अर्थात मंत्री भुजबळ यांचे नाव टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे भुजबळ समर्थक चांगलेच नाराज झालेले दिसतात. हा उद्घाटनाचा कार्यक्रम करू नये, यासाठी देखील प्रशासनावर चांगला दबाव होता.

हा दबाव झुगारून स्थानिक नेत्यांनी कार्यक्रम घडवून आणला. आता त्याचा दुसरा अंक सुरू झाला आहे. संबंधित कार्यक्रमाला स्थानिक आमदारांना निमंत्रित करणे बंधनकारक असते. मात्र प्रशासनाने (Government) त्यांना तशी सूचना दिली नाही. तसेच कार्यक्रम स्थळी लावलेल्या कोनशिलेवर देखील मंत्री भुजबळ यांचे नाव नाही. त्यामुळे मंत्री भुजबळ नाराज झाले आहेत. या नाराजीतूनच त्यांनी आता विशेष अधिकार भंगाची सूचना थेट विधानसभा अध्यक्षांना दिली आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांत तो चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

Chhagan Bhujbal
Rohit Pawar : रोहित पवारांना आठवले 'माफीवीरांचे' कारनामे; मग काय संस्कारसह सर्वच काढलं...

विशेष म्हणजे तक्रार करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अमृता पवार या भारतीय जनता पक्षात आहेत. भुजबळ आणि पवार यांचे हे दोघेही सध्या महायुतीचे घटक आहेत. एकीकडे महायुतीमध्ये समन्वय असल्याचा दावा सातत्याने वरिष्ठ नेते करीत असतात. निफाड तालुक्यात मात्र एका अंगणवाडीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून महायुतीच्या नेत्यांमध्येच किती विसंवाद आहे, याचे उदाहरण पाहायला मिळाले.

स्थानिक पातळीवर चर्चा किंवा संवाद न होता थेट विधानसभा अध्यक्षांपर्यंत हे प्रकरण केले आहे. त्यामुळे कार्यक्रम छोटा मात्र मानापमान मोठा. त्यातून नाराज झालेल्या मंत्र्यांचा विशेषाधिकार कितीतरी मोठा अशी जणू मनाप्रमाणे स्पर्धा सुरू झालेली दिसते. या अंगणवाडीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून स्थानिक सरपंच ते मंत्री यांच्यामध्ये सुरू झालेला हा मानापमान नाट्याचा वाद आणखी किती पुढे जातो याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com