Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा सुहास कांदेंना ग्रीन सिग्नल, भुजबळांचे काय?

Chief Minister Eknath Shinde green signal to Suhas Kande : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदगावच्या दौऱ्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे. राजकोट येथील घटनेमुळे टिकेचे धनी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचक विधान केले.
Eknath Shinde, Suhas Kande
Eknath Shinde, Suhas KandeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी नांदगाव येथे 71 फूट उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. राजकोट येथील घटनेमुळे टिकेचे धनी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचक विधान केले.

महायुती सरकारमध्ये तिन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करीत आहे. आपल्या हक्काच्या मतदारसंघात जाऊन लोकार्पण आणि उद्घाटनाचे कार्यक्रम करीत आहेत. यामधून विद्यमान आमदारांना बळ देण्याचे आणि इच्छुकांना उभारी देण्याचे काम यातून सुरू आहे.

नांदगाव येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजवले. त्यांच्या भाषणातील प्रत्येक मुद्दा मतदारांना खुष कसे करता येईल, या दृष्टीने होता. लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करतानाच त्यांनी नांदगाव शहरासाठी दहा कोटींच्या निधीची घोषणा केली.

आमदार सुहास कांदे हे किती कार्यक्षम आमदार आहेत, हे सांगताना त्यांनी आमदार कांदे यांच्यावर अक्षरश: स्तुतीसुमने उधळली. आमदार कांदे यांच्या कामाचे कौतुक करताना या मतदारसंघाचे चित्र त्यांनी बदलून दाखवले. अन्य कोणाला शक्यच नव्हते, अशी कामे केली. या शब्दात त्यांनी आमदार कांदे यांचे कौतुक केले.

Eknath Shinde, Suhas Kande
Beed Politics : अजितदादांची राष्ट्रवादी 4 जागांवरच ठाम; उरलेल्या 2 जागांवर भाजप-शिंदेसेनेची वाटणी कशी?

त्यामुळे आमदार कांदे यांनाही मूठभर मास चढले नसेल, तरच नवल. यानिमित्ताने आगामी निवडणुकीतही मतदारांनी त्यांना भरभरून प्रतिसाद द्यावा, असे सांगत आमदार कांदे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले. विधानसभा निवडणुकीचा प्रचार देखील केला. असे एकच दगडात दोन पक्षी मारण्याचे काम त्यांनी केले.

मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांचे हे विधान महायुतीतील सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना इशारा मानायला हरकत नाही. विरोधकांनाही या कार्यक्रमाने थोडेसे दबावाखाली आणले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट आमदार कांदे यांच्या विरोधात मोर्चे बांधणी करीत आहे.

या मतदारसंघात 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal) विरुद्ध शिवसेनेचे आमदार कांदे यांच्यात लढत झाली होती. यामध्ये कांदे यांनी बाजी मारली. मात्र मधल्या काळात या दोन्ही पक्षात बंडखोरी झाली. त्यामुळे हे दोन्ही उमेदवार सध्या महायुतीमध्ये आहे.

आमदार भुजबळ यांच्याबरोबरच माजी खासदार समीर भुजबळ यांनी देखील गेल्या महिन्याभरात नांदगाव मतदारसंघात (Nandgaon Constituency) चार ते पाच वेळा दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांनी आपल्या समर्थकांना संघटित करण्याचा कार्यक्रम केला. त्यांनी एक प्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आमदार कांदे यांच्यापुढे एकाच वेळी महाविकास आघाडी आणि महायुतीतील भुजबळ असे दोन विरोधक तयारी करीत आहेत.

Eknath Shinde, Suhas Kande
Ajit Pawar And Yogesh Kshirsagar : मुंडेंकडून ‘लिफ्ट’, पवारांकडून ‘बळ’; राष्ट्रवादीच्या जनसन्मावर क्षीरसागरांचा वरचष्मा

महायुतीत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) काय भूमिका घेतात? याला त्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. छगन भुजबळ आणि आमदार कांदे यांच्यातील राजकीय सख्ख्या सर्वश्रुत आहे. आमदार कांदे यांनी भुजबळ यांना डिवचण्याची एकही संधी सोडलेली नाही.

आगामी विधानसभा निवडणुकीत भुजबळ हे देखील तो हिशेब चुकता केल्याशिवाय राहणार नाही हे स्पष्ट आहे. त्या दृष्टीने मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा महायुतीत एकोपा निर्माण करणारा ठरेल का? याची उत्सुकता आहे.

भुजबळ बंधूंच्या नांदगाव मतदारसंघातील हालचाली म्हणजे कांदे यांना नवीन विरोधक तयार करणे की स्वतःच महायुतीची बंधने झुगारून अपक्ष उमेदवारी, अशा अनेक चर्चा सध्या सुरू आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने या चर्चांना घुमारे फुटले आहे.

त्यामुळे आमदार कांदे यांना महायुतीची उमेदवारी कालच्या दौऱ्यात जाहीर झाल्यासारखीच आहे. त्याच वेळी आमदार कांदे यांना महायुतीकडूनच अपशकुन होणार, असे संकेत देखील आहेत. त्यामुळे येत्या महिन्याभरात यावर शिक्का मुहूर्त होईल.

त्या दृष्टीने मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा आमदार कांदे यांना लाभदायी की त्यांच्या राजकीय विरोधकांना बळ देणारा यावर सध्या चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com