Chhagan Bhujbal Politics: शरद पवारांचे विश्वासू श्रीराम शेटे भुजबळांच्या भेटीला... बंद दाराआड झाली चर्चा!

Shriram Shete Met Bhujbal and a New Discussion Broke Out: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी आज मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतल्याने खळबळ.
Sharad Pawar & Chhagan Bhujbal
Sharad Pawar & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि राजकीय बातम्या यांचे जवळचे नाते आहे. नाशिक मुक्कामी असलेल्या भुजबळ यांच्याशी आज शरद पवार समर्थक नेत्याने भेट घेऊन चर्चा केली.

कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी आज भुजबळ फार्म येथे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली. शेटे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विश्वासू सहकारी आहेत.

श्री शेटे आणि भुजबळ यांची सुमारे अर्धा तास बंद दारा चर्चा झाली. या चर्चेचा तपशील मिळू शकला नाही. श्री शेटे सामान्यतः माध्यमांपासून अंतर राखून असतात. त्यामुळे त्यांनी याबाबत बोलणे टाळले आहे.

श्री. शेटे यांच्या निकटवर्तीयांनी देखील भेट झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला. मात्र या भेटीत काय चर्चा झाली, याविषयी अनभिज्ञता व्यक्त केली आहे. सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहात आहेत. त्यामुळे या भेटीने खळबळ उडाली आहे.

Sharad Pawar & Chhagan Bhujbal
Devendra Fadnavis: फडणवीस बरसले, महाविकास आघाडीला म्हणाले, 'तोंड' वर करून निवडणुकीत येतात"

श्री भुजबळ जाहीरपणे वक्तव्य करीत नसले तरीही ते महायुतीमध्ये आनंदी नाहीत हे लपून राहिलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात देखील सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. या पक्षाचे अनेक आमदार आणि काही मंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते.

विविध राजकीय नेत्यांकडून देखील तसे संकेत दिले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्यपाल नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी सत्ताधारी गाडीच्या लोकप्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली. मात्र मंत्री भुजबळ आपल्या येवला मतदारसंघातील नियोजित कार्यक्रमात व्यस्त होते.

श्री. भुजबळ यांनी राज्यपालांची भेट टाळली. यापूर्वी देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नाशिकच्या दौऱ्यावर होते. श्री भुजबळ यांनी त्यावेळी देखील येवला विधानसभा मतदारसंघातच विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती. प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या कार्यक्रमात ते सहभागी होऊ शकले नव्हते.

Sharad Pawar & Chhagan Bhujbal
Shyamkant Saner Politics: काँग्रेस नेते सनेर संतापले, उपमुख्यमंत्री फडणवीस काँग्रेसला एव्हढे का घाबरतात?

या सर्व गोष्टींचा पूर्व इतिहास विचारात घेता, श्री भुजबळ आणि श्री शेटे यांच्यात आज झालेल्या भेटीने नवीन काही राजकीय घडामोडी घडतात की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याला कोणीही खात्रीशीर दुजोरा दिलेला नाही. मात्र त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात अस्वस्थता पसरण्याची शक्यता आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. विशेषता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विविध आमदारांमध्ये अस्वस्थता आहे.

यातील काही आमदार निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत फेरविचार करीत असल्याच्या बातम्याही आहेत. अशा स्थितीत श्री भुजबळ हे राज्यातील एक प्रमुख नेते असल्याने श्री. शेटे यांच्या आजच्या भेटीते एका नव्या बातमीला विषय मिळाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com