नाशिक : काहीही संबंध नसताना माझा छोटा राजन (Underworld Don Chhota Rajan) टोळी सोबत नाव जोडण्यात आले. याबाबत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास (Police starts Investgation) सुरु केलेला आहे. त्यात सर्व सत्य बाहेर येईलच. त्याबाबत बोलणे उचीत नाही. मात्र मी भाई युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी नाही. एव्हढेच सांगेन, असे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले.
नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी काल भुजबळ यांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेला दावा मागे घ्यावा यासाठी आपल्याला छोटा राजन यांच्या पुतण्याने धमकीचा फोन केला होता. यासंदर्भात श्री. भुजबळ यांच्याकडे आज पत्रकारांनी विचारणा केली. यावेळी ते म्हणाले, श्री. कांदे याना टोला लगावताना `मी काही नेता नाही. तेच नेते आहेत` या प्रकरणाची पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक चौकशीत सुहास कांदे यांनी चालवायला घेतलेल्या टोलनाक्यावर झालेल्या मारहाण प्रकरणी त्यांना धमकी देण्यात आली आहे. टोल नाक्यावर कांदे यांच्या लोकांनी ज्या इसमाला मारहाण केली आहे त्यांच्या सांगण्यावरून त्यांना धमकी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यामुळे सुहास कांदे प्रकरणाला नवं वळण मिळाले आहे.
यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, ``खोटे आरोप लावण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. काय कारण आहे मला काही माहिती नाही. धमकीच्या फोनविषयी देखील मी मुख्यमंत्री व सर्व मंत्र्यांना सांगितले. त्यात काय तथ्य आहे, ते संबंधीत यंत्रणा सांगतील ना. जे तपास करणारे अधिकारी आहेत, ते काय खोटे बोलणार आहेत. जिल्हाधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, प्रांत आहेत, एक एकाला घेऊन त्यांनी विचारावे काय कारण आहे. उगीच काही तरी चुकीचे आरोप करायचे. खोटे आरोप करायचे. कशासाठी? भुजबळांचे नाव आल्याबरोबर त्याला ताबडतोब मीडियामध्ये वेटेज येते. मग आणची बदनामी सुरु. माझी सगळ्यांना विनंती आहे, अशा ज्या ज्या वेळेला बातम्या येतात त्यावेळेला माध्यमांनी ताबडतोब कांदे आणि भुजबळ वादामध्ये छोटा राजनची एंट्री. संबंध नाही काही नाही. पाच-पन्नास वर्षांची आमची तपश्चर्या आहे, ती काय पाण्यात घालायची काय? पण पब्लिक सब जानती है.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.