माझ्याकडे १८, १९ रेड झाल्या, रेड वेळी पत्नी नातवांसह दिवसभर मॅालमध्ये बसून रहायची!

छगन भुजबळ यांनी आयुष्यातील अतिशय खडतर कालखंडातील आठवणींना उजाळा दिला.
Chhagan BHujbal
Chhagan BHujbalSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : भाजपच्या नेत्यांनी (BJP Leaders) अतिशय सुडबुद्धीने कारवाया केल्या. माझ्याकडे एक, दोन नव्हे तर १८ ते १९ वेळा रेड झाल्या. त्याचा त्रास, ते वातावरण, अडवणूक याचा लहान मुलांवर परिणाम होऊ नये, यासाठी रेड सुरु असताना पत्नी मीना (Wife Meena Bhujbal) नातवंडांना घेऊन मॅालमध्ये अक्षरशः बसून रहायची. ते अतिशय वाईट दिवस आम्ही अनुभवले, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले.

Chhagan BHujbal
देवेंद्र फडणवीस हे तर बॅक बेंचर; मुंडे त्यांना माझ्याकडे घेऊन आले होते!

दिवाळीच्या पार्शवभूमीवर श्री. भुजबळ यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. आपण राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व पोलिस यंत्रणेचे प्रमुख असताना आपल्यावर `ईडी`ची कारवाई झाली. त्यात तत्थ्य नव्हते हे पुढे आढळले. त्याबाबत आपण कधी तक्रार करणाऱ्या किरीट सोमय्यांना विचारले काय? असा प्रश्न विचारला. त्यावर श्री. भुजबळ यांनी सोमय्यांचा विषय बाजुला ठेवत, हे सर्व भाजपच्या सर्वोच्च न्यायालयाचे नियोजित काम होते. मनुवाद्यांच्या विरोधात जे काम करत होते, समतेचा लढा लढत होते, त्यांच्यावर भाजपच्या मंडळींचा राग होता. त्यावेळी आमच्यापैकी काही मंडळी देखील चुकीची माहिती देत होती. माझ्या काही मालमत्ता सील होण्यास सुरवात झाली होती. खासदार समीर भुजबळांना त्यांनी अटक केली. तेव्हा मी अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निमंत्रणावरून अमेरिकेत होते.

Chhagan BHujbal
केंद्र महाराष्ट्राचा अवमान करते, म्हणूनच भाजप नेते महाराष्ट्रद्रोही आहेत!

ते म्हणाले, ना मी कुठल्या कंपनीत संचालक होतो. ना कुठल्या कंपनीशी माझा काही संबंध होता. ना मचणकरांनी मला पाच पैसे दिलेले होते. ना महाराष्ट्र सदन प्रकरणात माझा थेट संबंध होता. महाराष्ट्र सदन विषयात रुपयाचा देखील व्यावहार झाला नव्हता. हे सर्व प्रकरण मंत्रीमंडळाच्या निर्देशानुसार माझ्याकडे आले होते. मात्र अत्यंत सुयोजीत पद्धतीने तक्रारी व खोट्या बातम्या पेरल्या गेल्या. त्याची सर्व माहिती मी पवार साहेबांना दिली. तेव्हा आहे त्या केसला सामोरे जाण्याच्या सुचना मिळाल्या. त्यानुसार मी स्वतः `ईडी`च्या कार्यालयात गेलो होतो. त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिली. रात्री नऊला त्यांनी सांगितले, सॅारी हम नही चाहते, लेकीन हम मजबुर है. हम आपको अरेस्ट कर रहे है. त्यांच्यावर देखील दबाव होता, हे स्पष्ट दिस होते. त्यानंतर ते माझा मुलगा पंकजच्या मागे लागले. तो अटकपूर्व जामीनाच्या धावपळीत अडकला.

श्री. भुजबळ म्हणाले, आज देखील केंद्रीय तपास संस्था अनेकांवर कारवाया करीत आहेत. एक-दोन रेड होतात. माझ्यावर मात्र एक, दोन नव्हे अठरा ते एकोणीस वेळा धाडी पडल्या. रेड म्हटल्यावर घरात सगळीकडे उलट, पालट, वस्तू काढून पसरत, तपासत. प्रश्नोत्तरे. घरात प्रचंड ताण-तणाव. फक्त महिला घरी असायच्या. लहान मुलांवर त्याचा खुप परिणाम व्हायचा. तो अतिशय वाईट कालखंड होता. अगदी धाड टाकणाऱ्यांना देखील ते पटत नसावं. त्यामुळे आधल्या दिवशी घरी फोन करून, आम्ही उद्या येत आहोत, असे कळवत असत. तेव्हा माझी पत्नी मीना नातवंडांवर त्या सर्व तपासण्यांचा परिणान होऊ नये, यासाठी रेड सुरु असताना सकाळीच त्यांना घेऊन मॅालमध्ये जायची. दिवसभर ती नातवंडांना घेऊन ती तीथे बसुन असायची. रेडचे काम आटोपल्यावर सायंकाळी उशीरा मुलांना घेऊन घरी यायची, अशी आठवण त्यांनी सांगितली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com