नाशिक : देवेंद्र फडणवीस (Devendra Phadanvis) हे तर बॅक बेंचर होते. (स्व.) गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) फडणवीस यांच्या एका कामासाठी त्यांना माझ्याकडे घेऊन आले होते. एकनाथ खडसे यांनी त्यांना विधीमंडळाचे कामकाज शिकवले, असे राज्याचे अन् व नागरी पुरवठा मंत्री, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एका वाहिनीला दिलेल्या प्रदिर्घ मुलाखतीत श्री भुजबळ यांनी त्यांच्या विरोधात रचलेले `ईडी`चे कारस्थान, २०१४ पूर्वी भाजपने देशात रचलेले काँग्रेस नेत्यांचे बदनामी षडयंत्र आणि राज्याच्या राजकारणातील सध्याची स्थिती याबाबत अतिशय सविस्तर व मनमोकळी चर्चा केली.
भाजप ओबींसींचा फक्त वापर करते
श्री. भुजबळ म्हणाले, भाजपच्या वरीष्ठ नेत्यांना ओबीसी व अन्य समाजाची मंडळी अजिबात नको आहेत. त्यांना त्यांचा फक्त वापर करून घ्यायचा आहे. एखादा मागासवर्गीय, ओबीसी नेते मोठा झाला, तर ते लगेच भाजपमधील एखादा ओबीसी, मागासवर्गीय नेत्याला त्याच्या विरोधात आरोप, प्रत्यारोप करायला मागे सोडतात. भाजपच्या वरीष्ठ नेत्यांचे हे अगदी स्पष्ट कारस्थान व धोरण आहे.
ओबीसींच्या विषयावर मी देशभर अनेक स्तरावर जनजागृती केली. बिहारला गांधी मैदानावर मी सात लाख ओबीसींचा मेळावा घेतला. नवी दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यांत मेळावे घेतले. त्यातूनच माझ्या विरोधात भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट का कापले? याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. मात्र काहीच काम नसल्याने घरी बसलेल्या बावनकुळे यांना त्यांनी माझ्याविरोधात आरोप करायला मोकळे सोडले. जो जो मागासवर्गीयांच्या हितासाठी काम करेल त्याला खुप अडचणींना सामोरे जावे लागते. मग मायावती, लालूप्रसाद यादव असे अनेक आहेत. ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स अशा विविध मार्गाने त्यांचे तोंड बंद करायचे. आरोप करीत सुटायचे. अशी खुप लांबलचक यादीच आहे.
देवेंद्र फडणवीस हे तर बॅक बेंचर
ते पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे तर बॅक बेंचर होते. मी जेव्हा गृहमंत्री व उपमुख्यमंत्री होतो, तेव्हा (स्व.) मुंडे एक दिवस फडणवीस यांना माझ्याकडे घेऊन आले होते. श्री. फडणवीस यांचे नागपूर येथील काही तरी काम होते. मुंडे साहेबांनी सांगितले की, यांना आपल्याला मदत करायची आहे. तेव्हा मी लगेच फोन केला. तोपर्यंत फडणवीस कोण आहेत, माहित नव्हते. त्यांना पाहिलेही नव्हते. मुंडे यांनी त्यांचा परिचय करून दिला. पुढे मग एकनाथ खडसे यांनी त्यांना विधीमंडळ काय, कोणत्या विषयावर बोलावे, ते विषय़ दिले. विरोधी पक्सषाकडे माल मसाला भरपुर असतो. फडणवीस सुशिक्षीत होते. ते मांडायचे विषय चांगला. त्यातून फडणवीस तयार झाले.
भाजपचे २०१४ पूर्वीचे कारस्थान
केंद्र व राज्यातील भाजपचे २०१४ नंतरची सत्ता, विविध नेत्यांमागे लागलेला केंद्रीय यंत्रणांचा ससेमीरा याविषयी आपल्याला काय वाटते?. त्यावर भुजबळ यांनी त्याबाबत सविस्तर सांगितले. ते म्हणाले, २०१४ पूर्वी भाजपने अतिशय मोठे कारस्थान केले, हे मात्र नक्की. तेव्हा जीथे जीथे काँग्रेसची सत्ता होती, तीथे किरीट सोमय्यांसारखी मंडळी जायची व बेछुट आरोप करायची. हजारो कोटींचा गैरव्यावहार झाल्याचे धादांत खोटे बोलायची. वत्रमानपत्रात त्याचे मथळे व्हायची. काँग्रेसची मंडळी देखील गोंधळायची. अगदी असल्याच एका, रोम गोपाल वर्मा यांना बाँम्बस्फोटानंतर हॅाटेल ताजमध्ये बरोबर नेले म्हणून चक्क विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिला होता. आज हे आठवल्यावर भाजपचे ते कारस्थान किती मोठे होते याची जाणीव होते. असे मोठे मोठे आरोप करण्याचे कारस्थान तेव्हा रचले गेले. आता देखील भाजप तेच करीत आहे. मात्र आता सगळे शहाने झाले आहेत. त्या आरोपांत काहीच तत्थ्य नसते हे जनतेला, राज्यकर्त्यांना कळले आहे. त्यामुळे त्यांच्या या कारस्थानाला कोणी बळी पडणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.