Chhagan Bhujbal Politics: समर्थकांचा दावा, जातनिहाय जनगणनेचे श्रेय छगन भुजबळ यांचेच!

Chhagan Bhujbal; Samta Parishad celebration in Nashik on Announcement of caste-wise census-नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांनी जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले.
Samta Parishad celebration at Nashik
Samta Parishad celebration at NashikSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. याबाबतचा निर्णय त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. राजकीय पक्ष आणि संघटनांत त्याच्या विविध प्रतिक्रिया देशभर उमटल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. त्याचे अखिल भारतीय समता परिषद अर्थात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ समर्थकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. शहरातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले पुतळ्याजवळ जमून समर्थकांनी जोरदार घोषणा दिल्या.

Samta Parishad celebration at Nashik
Gulabrao Patil Politics: गुलाबराव पाटील संतप्त; हम करे तो कॅरेक्टर ढिला... ‘पावन’ होऊ पाहणाऱ्या ‘गुलाबा’च्या काट्यांनी फुलांचा प्रस्थापित राजा रक्तबंबाळ!

राज्यात ओबीसी आरक्षणातील समस्या आणि या संदर्भात सुरू असलेले न्यायालयीन निवाडे हा गंभीर प्यायचा आहे यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संदर्भात इम्पेरीकल डेटा देण्यात यापूर्वी केंद्र शासनाने असमर्थता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर जातनिहाय जनगणनेचा निर्णय दिलासा देणारा मानला जातो.

Samta Parishad celebration at Nashik
Radhakrishna Vikhe Patil : 'उलट आमचे अनेकांना दणके बसलेत'; '420'च्या दाखल गुन्ह्यावरून टीकेची झोड उठवणाऱ्यांवर मंत्री विखे संतापले

अखिल भारतीय समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळ यांसह विविध नेत्यांनी ओबीसींच्या प्रश्नांवर आणि त्यांच्या अधिकाऱ्यांबाबत सातत्याने संघर्ष केला आहे. जातनिहाय जनगणना व्हावी ही त्यांचीच मागणी होती. त्यासाठी प्रदीर्घकाळ त्यांनी लढा दिला, असे समता परिषदेचे सरचिटणीस दिलीप खैरे यांनी सांगितले.

राज्यातील आणि देशातील ओबीसी समाज संघटित व्हावा, यासाठी १९९२ मध्ये अखिल भारतीय समता परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी देशभर मेळावे घेऊन या समाज घटकाला जागृत करण्याचा प्रयत्न भुजबळ यांनी केला. १९९२ मध्येच जातनिहाय जनगणनेच्या मागणीला सुरुवात झाली होती. या लढ्याला आता यश आले आहे असा दावाही, श्री खैरे यांनी केला.

यावेळी श्री खैरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई नाका येथील महात्मा फुले स्मारकात ढोल ताशे वाजवत जल्लोष झाला. यावेळी कार्यकर्त्यांनी नागरिकांना पेढे वाटले. केंद्र शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करतानाच त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.

समता परि।देचे पदाधिकारी बाळासाहेब कर्डक, नानासाहेब महाले, समाधान जेजुरकर, शहराध्यक्ष कविता कर्डक, अंबादास खैरे, पूजा आहेर, अशा भऺदूरे, अमोल नाईक, शशी हिरवे यांसह समता परिषदेचे पदाधिकारी आणि श्री भुजबळ यांचे समर्थक मोठ्या संख्येने यावेळी सहभागी झाले होते.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com