Gulabrao Patil News: विधानसभा निवडणुकीत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यात देवकर यांचा पराभव झाला होता. आता देवकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात दाखल होत आहेत.
विधानसभेसह जिल्हा बँकेच्या राजकारणात मंत्री पाटील आणि देवकर हे दोन्ही गुलाबराव सतत झुंजत असतात. आता माजी मंत्री देवकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात दाखल होत आहेत. त्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देवकर यांच्या गुलाबाच्या अक्षरशः पाकळ्या उपटल्या आहेत.
पालकमंत्री पाटील यांनी आखाजीच्या मुहूर्तावरच राजकीय बाण सोडले. त्यात त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही जखमी केले आहे. अजित पवार छातीठोकपणे म्हणतात मी माणसे पारखून त्यांना पक्षात घेतो. मात्र लवकरच अजित पवार यांनाही कळेल की, त्यांनी कशी माणसे पक्षात घेतली आहे. त्यांना निश्चित पश्चाताप होईल.
उपमुख्यमंत्री पवार यांनी फार सुंदर माणसे तपासून घेतली आहेत. आगामी काळात त्यांना त्याचे वास्तव दिसून येईल. त्या गुलाबराव देवकर यांच्यासारखे लोक पाहता आगामी काळात त्यांच्या लक्षात येईल की, आपण चुकीच्या माणसाला बरोबर घेतले आहे, या शब्दात पालकमंत्री पाटील यांनी पवार यांनाही सुनावले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, गुलाबराव देवकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात का जात आहेत हे सगळ्यांना ठाऊक आहे. मात्र तिकडे गेले तरी त्यांची लफडी बंद होणार नाहीत. जिल्हा बँकेकडून त्यांनी दहा कोटींचे कर्ज घेतले आहे. बॅकेच्या सभासदाला कर्ज घेता येत नाही. याबाबत मी थेट निवडणूक आयोगाला तक्रार केली आहे.
एकंदरच जिल्हा बँकेतील राजकारण आता महायुतीत अस्वस्थता निर्माण करू लागले. त्यातही मंत्री पाटील आणि माजी मंत्री देवकर या दोन्ही गुलाबरावांची झुंज सुरू झाली आहे. त्यामुळे जळगावचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.