Chhagan Bhujbal News : ‘मी एकटा कसा मराठा आरक्षण रोखू शकेन’

How can Chhagan Bhujbal alone oppose Maratha reservation-मंत्रिमंडळातील मराठा मंत्र्यांनी एकमताने आरक्षणाचा निर्णय घेतला, तर अडचण कशी येईल.
Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Chhagan Bhujbal & Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maratha Resrvation News : राज्याच्या मंत्रिमंडळातील मराठा समाजाच्या नेत्यांनी जर एकमताने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला, तर मी एकटा कसा त्याला विरोध करू शकेन?, असा प्रश्न राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. (Chhagan Bhujbal says, Maratha leaders shall unanimously take decsion on Maratha Reservation)

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मराठा आरक्षणावरील (Maratha reservation) वादविवाद थांबण्याची चिन्हे नाहीत. आज याबाबत भुजबळ यांनी मंत्रिमंडळातील (Maharashtra) सर्व मराठा नेत्यांनी एकमताने निर्णय घेतल्यास मी एकटा त्याला कसा विरोध करेन, असे म्हटले.

Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Maratha Reservation Issue : ‘भुजबळ मराठा समाजाचा मोगलांपेक्षाही जास्त द्वेष करतात’

भुजबळ आज आपल्या मतदारसंघात येवला येथे आले होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकारांशी झालेल्या संवादात ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल?, याबाबत मनोज जरांगे-पाटील मलाच सातत्याने टीकेचे लक्ष्य का करतात?. त्यांनी याबाबत इतर मंत्री, नेत्यांनादेखील प्रश्न केला पाहिजे.

मनोज जरांगे-पाटील यांची अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर वातावरण निर्मिती सुरू आहे. विविध भागातून त्यासाठी समाज बांधव जात आहेत. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांच्याबाबत काल काही नेत्यांनी आरोप केले होते.

यासंदर्भात भुजबळ यांनी नवे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, की मी एकटा या आरक्षणाला विरोध करतो, असे पसरवले जात आहे. त्यात काहीही तथ्य नाही. याबाबत तुम्ही राज्यातील कोणत्याही नेत्याला विचारू शकता. अगदी शरद पवार किंवा काँग्रेसच्या एखाद्या नेत्याला विचारावे. उर्वरित सर्व मराठा नेत्यांनादेखील विचारू शकता. सर्वांनी एकमताने आरक्षण दिले, तर मी एकटा त्याला कसा काय विरोध करू शकतो?. त्यामुळे याबाबत सगळे मलाच का विचारतात? असा प्रश्न त्यांनी केला.

Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Dada Bhuse News : भुजबळांपाठोपाठ नाशिकचे दादा भुसेदेखील ‘ईडी’च्या रडारवर येणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com