Narayan Patil meets Ram Shinde : राम शिंदे राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत; पवारसाहेबांच्या आमदारानं घेतली भेट, बंद दाराआड दोघांमध्ये बरचं काही शिजलं

Solapur NCP MLA Narayan Patil Meets BJP Leader Ram Shinde in Jamkhed Ahilyanagar : सोलापूरमधील एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नारायण आबा पाटील यांनी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेंची भेट घेतली.
Narayan Patil meets Ram Shinde
Narayan Patil meets Ram ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra political news : विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा राज्याच्या राजकारणात सर्वाधिक संघर्ष कोणाशी राहिला असेल, तर तो म्हणजे, शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार आणि त्यापाठोपाठ भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी. अलीकडच्या काळात आमदार पवार यांच्याशी राजकीय संघर्ष शिगेला पोचला असून, त्यातून राम शिंदेंनी थेट शरद पवार यांना देखील आव्हान देण्यास सुरुवात केली आहे.

शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार नारायण आबा पाटील यांनी शनिवारी रात्री चौंडी (ता. जामखेड) गाठत राम शिंदेंची तब्बल अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली. या चर्चेचा तपशील दोघांकडून सांगितला जात नसला, तरी वेळ आणि टायमिंग पाहता, राम शिंदे आता राज्याच्या राजकारणात भूकंप घडवण्याच्या तयारीत असून, त्याचा पहिला धक्का शरद पवार यांना देणार की काय, असे संकेत मिळू लागले आहेत.

सोलापूरमधील आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणूक नुकताच झाली. ही निवडणूक चुरशीची झाली. यात आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजय मिळवला. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या निवडणुकीत आपल्याच पक्षाचे आमदार नारायण पाटील यांच्या पॅनल विरोधात काम केल्याचा आरोप आहे. आमदार नारायण पाटील यांनीच तसा आरोप केला आहे. असे असतानाही नारायण पाटील यांच्या पॅनलने कारखाना निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडवला आणि कारखान्यावर एकहाती सत्ता स्थापन मिळवली. त्यामुळे ही निवडणूक राज्यात चांगलीच गाजली होती.

Narayan Patil meets Ram Shinde
Maharashtra Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर; विधानसभा निवडणुकीच्या...

आमदार नारायण आबा पाटील आपल्यासह नवनिर्वाचित संचालकांसह शनिवारी सायंकाळी चौंडी (ता. जामखेड) इथं दाखल झाले. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांची तिथं निवासस्थानी भेट घेतली. राम शिंदे आणि नारायण पाटील या दोघा नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. ही चर्चा आता राज्याच्या राजकारणाचा विषय बनली आहे. या दोघा नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या मुद्यावरून चर्चा झाली, याचा आता आखाडे बांधले जाऊ लागले आहेत.

Narayan Patil meets Ram Shinde
Ram Shinde BJP : 'हमारे अंदर 'राम' भी है, और 'रावण' भी'! भाजपच्या राम शिंदेंच्या पोस्टचा अर्थ काय?

चौंडी (ता. जामखेड) इथं 6 मे रोजी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीच्या तयारीच्या नियोजनात राम शिंदे व्यस्त असतानाच नारायण पाटील यांनी घेतलेली भेट चर्चेत आली. ही भेट नियोजित होती, अशी माहिती समोर येत आहे. परंतु राम शिंदे यांच्या निकटवर्तीयांकडून मात्र, या भेटीबाबत कोणतीही पूर्वकल्पना नव्हती, अशी माहिती समजली.

राम शिंदे यांनी आमदार नारायण पाटील आणि आदिनाथच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार केला. शेतकरी हितासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा शब्द यावेळी राम शिंदेंनी संचालकांना दिला. राम शिंदेंनी दिलेला शब्द मोठा असल्याने, दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड झालेली चर्चा विरोधक अधिक चघळू लागलेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com