Operation sindoor: छगन भुजबळ यांची सुचक प्रतिक्रीया, ... मात्र आपल्याला तयार रहावे लागेल!

Chhagan Bhujbal; The country is with the Indian Army, we have to be prepared -याप्रसंगी आपसातील वाद विसरून एकोपा दाखविणे ही आपल्या देशाची गरज आहे.
Chhagan Bhujbal, Narendra Modi & Rahul Gandhi
Chhagan Bhujbal, Narendra Modi & Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

India Air Strike: पहलगाम पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. या कारवाईबद्दल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भारतीय लष्कराचे अभिनंदन केले आहे. या स्थितीत देशातील सगळ्यांनीच एकसंघपणे सरकारच्या पाठीशी उभे राहावे, असेही ते म्हणाले.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने आज पहाटे हल्ला केला. भारतीय हवाई दलाच्या या हल्ल्यात विविध ठिकाणी दहशतवादी तळांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये केवळ दहशतवाद्यांना टार्गेट करण्यात आले होते, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal, Narendra Modi & Rahul Gandhi
Nashik Mock Drill: मॉक ड्रिल; नाशिकमध्ये आढळल्या त्रुटी, प्रशासनाची ऐनवेळी का झाली धावपळ?

या संदर्भात श्री. भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कराचे अभिनंदन केले आहे. सबंध विरोधी पक्ष विशेषता काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महाराष्ट्रातील शरद पवार यांनी याप्रसंगी केंद्र सरकारला खंबीर पाठिंबा व्यक्त केला आहे. या निमित्ताने भारत एकसंघ असल्याचा संदेश जगभर गेला आहे असे, भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal, Narendra Modi & Rahul Gandhi
Dr. Bharti Pawar: भाजप मंत्र्याच्या घरी धक्कादायक प्रकार; सोशल मीडियाने गुंता सोडवला अन् माय लेकीची घडली भेट!

दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना गोळ्या घातल्या. भारतीय लष्कराने मात्र पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांना त्रास होईल असे काहीही करणे टाळले. हवाई दलाकडून केवळ दहशतवाद्यांनाच टार्गेट करून हल्ला करण्यात आलेला आहे. हे आपल्या भारतीय लष्कराचे वैशिष्ट्य आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बाष्कळ बडबड करणाऱ्या पाकिस्तानचे सरकार आणि लष्कराला भारताने चोख उत्तर दिले आहे. मात्र यापुढेही कारवाया होऊ शकतील. त्यामुळे केंद्र शासन ज्या ज्या सूचना करतील त्या सर्वांचे पालन नागरिकांनी करावे. आपल्याला यापुढेही तयार आणि तत्पर राहावे लागेल, असे भुजबळ म्हणाले.

या काळात धार्मिक अथवा अन्य अंतर्गत वाद बाजूला ठेवले पाहिजेत. कोणतेही तंटे बखेडे उभे राहतील, असे काम कोणीही करू नये. भारतीय समाज आणि त्यातील एकोपा याला विशेष महत्त्व आहे. हल्ला, प्रतिहल्ला ही कारवाई होतच राहणार आहे. त्यामुळे आपण सर्व यापुढे तयारीत राहिले पाहिजे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com