
Mock Drill Nashik News: पहेलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. मंगळवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी केंद्रांवर भारताने हल्ले केले.
या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २४४ ठिकाणी आज मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी आणि प्रशासनाने कोणत्या दक्षता घ्याव्यात याचा सराव यामध्ये असेल. नाशिक शहरात मर्यादित स्वरूपात हे मॉक ड्रील आज होणार आहे. याबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
मॉक ड्रिलची तयारी सुरू असतानाच गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. मॉक ड्रिलसाठी नागरिकांना सावध करणारे भोंगे वाजविले जातात. नऊ ठिकाणी असे भोंगे आहेत. यातील महापालिका कार्यालय जवाहर भवन नाशिक रोड, इंडिया सिक्युरिटी प्रेस नेहरूनगर वसाहत, महापालिकेच्या डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालय या चार ठिकाणचे भोंगे नादुरुस्त असल्याचे आढळले आहे. ते तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले.
या संदर्भात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या प्रचारावर नाराजी व्यक्त केली. चल मीडियात अफवा पसरविल्या जात आहेत. अवास्तव माहिती दिली जात आहे. त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले.
आजचे मॉक ड्रिल केटीएचएम महाविद्यालया पुरते मर्यादित आहे. संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. त्यावेळी आपत्कालीन व्यवस्थापन समिती सदस्य आणि लष्कराचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मॉक ड्रिल ही नियमित कार्य पद्धती आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत धसका घेऊ नये. सावधानता बाळगावी. आवश्यक आणि प्रशासनाने मनाई केलेल्या भागात अथवा अन्यत्र फिरू नये. यासंदर्भात नाशिक शहरात सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात मनमाड येथे मॉकटेल करण्यात येईल असे यापूर्वी चर्चेत होते. प्रत्यक्षात मात्र नाशिक शहर वगळता अन्यत्र कुठेही मॉक ड्रिल होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर तणावाचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री पाक व्यक्त काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी ठिकाणांवर कारवाई करण्यात आली आहे. पार्श्वभूमीवर आज मॉक ड्रिल होत असल्याने नागरिकांना त्याविषयी प्रचंड उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.