Chhagan Bhujbal News : छगन भुजबळांची शिष्टाई; लासलगाव बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीची निवड बिनविरोध

Lasalgaon Bazar Samiti News : सभापतीपदी बाळासाहेब क्षीरसागर तर उपसभापतीपदी गणेश डोमाडे यांची निवड
Balasaheb Kshirsagar
Balasaheb KshirsagarSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal and Lasalgaon Bazar Samiti : लासलगाव बाजार समितीच्या निवडणुकीत नऊ जागा शेतकरी पॅनल तर आठ जागा शेतकरी विकास पॅनलला व एक जागा अपक्ष उमेदवार निवडून आलेले आहेत. या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री तथा शेतकरी विकास पॅनलचे नेते छगन भुजबळ यांच्या पॅनलला आठ जागेवर समाधान मानावे लागले. तर थोरे-जगताप गटाने नऊ जागा जिंकल्या आहेत. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत लासलगाव बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागले होते.

Balasaheb Kshirsagar
Suspension Of Ashish Deshmukh: मोठी बातमी! आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी; काय आहे प्रकरण ?

आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून नाशिक जिल्ह्यातील लासलगावची (Lasalgaon Bazar Samiti) ओळख आहे. या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. येथील दोन्ही गटाला काठावरचे बहुमत असल्याने सत्ता स्थापनेसाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. ही चुरस पाहता माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मध्यस्थी केली. त्यांच्या शिष्टाईला यश आल्याने लासलगाव बाजारसमितीचे सभापदी आणि उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली.

बाजार समितीच्या हिताच्या दृष्टीने सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी थोरे-जगताप गटासोबत सकारात्मक चर्चा केली होती. दरम्यान, बुधवारी सकाळी ११ वाजता बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यावेळी सभापती पदासाठी भुजबळ समर्थक तथा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांचा तर उपसभापती पदासाठी पाचोरे (खुर्द) सरपंच गणेश डोमाडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यानुसार त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

Balasaheb Kshirsagar
Maharashtra HSC Result Date: बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; उद्या निकाल जाहीर होणार

ही निवड जाहीर होताच दोन्ही गटाच्या समर्थांनी पेढे वाटप केले. तर गुलालाची उधळण करून ढोल ताशाच्या गजरात सभापती व उपसभापती यांचे जंगी स्वागत केले. या बाजारसमितीच्या सभापतीपदी बाळासाहेब क्षीरसागर तर उपसभापतीपदी गणेश डोमाडे यांची तहसीलदार शरद घोरपडे यांनी सत्कार केला.

ही निवड जाहीर होताच दोन्ही गटाच्या समर्थांनी पेढे वाटप केले. तर गुलालाची उधळण करून ढोल ताशाच्या गजरात सभापती व उपसभापती यांचे जंगी स्वागत केले. या बाजारसमितीच्या सभापतीपदी बाळासाहेब क्षीरसागर तर उपसभापतीपदी गणेश डोमाडे यांची तहसीलदार शरद घोरपडे यांनी सत्कार केला.

Balasaheb Kshirsagar
Maval BJP News: मावळात भाजपचा सूज्ञपणा; बाजार समिती सभापती, उपसभापतीच्या निवडणुकीत घेतला 'हा' निर्णय

यावेळी नवनिर्वाचीत सभापती क्षीरसागर (Balasaheb Kshirsagar) म्हणाले, "बाजार समितीच्या नाव लौकिकास साजेसे व सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. माझ्यावर भुजबळांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. बाजार समितीच्या विकासासाठी व शेतकरी हिताचे काम करून सुखसोई व सुविधा उपलब्ध करून पणन मंडळ व नाफेड यांच्याशी संवाद करून कांदा खरेदीला प्राधान्य दिले जाईल."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com