Chhagan Bhujbal Politics: येवल्यात भाजप कात्रीत सापडला; वरिष्ठ नेते भुजबळांसोबत तर कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात!

Chhagan Bhujbal took the issue of Yeola City President post to Chief Minister Devendra Fadnavis-येवल्यात भाजपची स्थिती दोन्ही घरचा पाहुणा उपाशी सारखी?, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर ठाम असलेल्या भाजपची निराशा होण्याची शक्यता
Sameer-Bhujbal-Girish-Mahajan
Sameer-Bhujbal-Girish-Mahajan Sarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News: येवल्याचा नगराध्यक्ष कोणाचा? यावरून स्थानिक पातळीवर तिढा निर्माण झाला आहे. यामध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. त्यामुळे आज त्यावर काय निर्णय होतो, याची उत्सुकता आहे.

येवला नगराध्यक्ष पदासाठी भाजपने दबावाचे राजकारण केले. त्यासाठी एकाच वेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. दुसरीकडे शिवसेना शिंदे पक्षाशीही वाटाघाटी केल्या. त्यामुळे आठवडाभर निवडणुकीच्या तयारी ऐवजी नेते वाटाघाटीतच व्यस्त आहेत.

मंत्री छगन भुजबळ यांच्यासाठी येवल्याचे नगराध्यक्ष पद प्रतिष्ठेचे आहे. त्यामुळे माजी खासदार समीर भुजबळ यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली. त्यातून आता हा प्रश्न थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेला आहे.

Sameer-Bhujbal-Girish-Mahajan
Sameer Bhujbal : भुजबळ काका-पुतण्यांना जबरदस्त धक्का, सुहास कादेंनी सगळा गेमच फिरवला

या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी देखील मुख्यमंत्र्यांना युती संदर्भात स्थानिक राजकीय फीडबॅक दिला आहे. या सर्व वादात स्थानिक कार्यकर्ते नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे पदाधिकारी अडून बसले आहेत. त्यामुळे गेले आठ दिवस यावर चर्चा चर्वन सुरू आहे.

Sameer-Bhujbal-Girish-Mahajan
Unmesh Patil case : शिवसेनेच्या शिलेदाराला न्यायालयाचा मोठा दिलासा; निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा डाव उलटवला!

भाजपचे राजन शिंदे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र हा अर्ज वैध ठरण्यासाठी एबी फॉर्म आवश्यक आहे. वरिष्ठ नेत्यांनी समजूत घातल्यावर कार्यकर्ते अडून बसले आहेत. त्यामुळे आज यावर निर्णय न झाल्यास गंभीर पेच निर्माण होऊ शकतो.

माजी खासदार भुजबळ यांनी भाजपच्या नेत्यांना नगराध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि अन्य जागांसाठी चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. वरिष्ठ नेत्यांची देखील श्री भुजबळ यांची चर्चा सुरू आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने यावर आज दुपारी निर्णय होण्याची शक्यता आहे.

अशातच नगराध्यक्ष पदासाठी अडून बसलेल्या भाजपकडे रुपेश दराडे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव आला आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांची भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांची याबाबत चर्चा होत आहे. रुपेश दराडे यांनी उमेदवारीसाठी भाजप पक्षात प्रवेश करावा, असा प्रस्ताव पुढे आला आहे.

एकंदरच तसे झाल्यास आयात उमेदवाराला उमेदवारी जाण्याची शक्यता आहे. यावरून नव्याने भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत मतभेद उफाळून आले आहेत. ताठर भूमिका घेतल्याने चर्चा लांबत गेली. त्याचा फटका भाजपच्या इच्छुकांना बसू शकतो. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांच्या येवल्यात आज काय निर्णय होतो याची उत्सुकता आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com