Sameer Bhujbal : भुजबळ काका-पुतण्यांना जबरदस्त धक्का, सुहास कादेंनी सगळा गेमच फिरवला

Shiv Sena–BJP alliance in Nandgaon : नांदगाव नगरपरिषदेत शिवसेना-भाजपची युती झाली आहे. समीर भुजबळांना बाजुला सारत आमदार सुहास कांदे यांनी मोठी खेळी केली आहे.
Chhagan Bhujbal, Sameer Bhujbal, Suhas Kande
Chhagan Bhujbal, Sameer Bhujbal, Suhas Kande Sarkarnama
Published on
Updated on

Nashik politics : राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी नांदगाव, मनमाड, येवला येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे) पक्षासोबत युती न करण्याची घोषणा केली होती. शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपला सोबत घेण्याची रणनिती समीर भुजबळ आखत होते. परंतु समीर भुजबळांच्या मनसुब्यांवर नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना(शिंदे) पक्षाचे आमदार सुहास कांदे यांनी पाणी फिरवलं आहे.

सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांना जबर धक्का दिला आहे. नांदगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना (शिंदेगट) व भाजप यांच्यात युती झाली आहे. भाजप व शिवसेनेने मिळून राष्ट्रवादीला बाजूला केलं आहे. आमदार सुहास कांदे व भाजपा तालुकाध्यक्ष संजय सानप यांनी पत्रकारपरिषद घेत शिवसेना व भाजप युतीची घोषणा केली आहे.

सुहास कांदे यांनी खेळलेल्या या खेळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला मोठा झटका बसला आहे. खासकरुन समीर भुजबळांसाठी हा मोठा धक्का आहे. नांदगाव व मनमाड दोन्ही ठिकाणी भाजप सोबत युती करण्यासाठी समीर भुजबळ प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेटही घेतली होती. या भेटीत येवल्यासह नांदगाव व मनमाड मध्ये युती करण्यासंदर्भात समीर भुजबळांनी गिरीश महाजन यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला होता.

Chhagan Bhujbal, Sameer Bhujbal, Suhas Kande
BJP Politics : भाजप आता मालेगावातही धमाका करण्याच्या तयारीत, एकनाथ शिंदेंचे मंत्री दादा भुसेंचं टेन्शन वाढलं..

नगर परिषद निवडणुका घोषित झाल्यानंतर महायुती तर्फे नाशिक जिल्ह्यात एकत्रित निवडणुका लढल्या जातील असे बोलले जात होते, मात्र समीर भुजबळांनी नांदगाव,मनमाड व येवल्यात या तीन्ही ठिकाणी विरोधक असल्याने शिवसेनेसोबत युती नको अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे सुहास कांदे यांनी देखील समीर भुजबळ यांना आव्हान दिलं.

एकीकडे समीर भुजबळ भाजपसोबत युती करण्यासाठी प्रयत्नशील असताना इकडे सुहास कांदे यांची देखील त्याचवेळी भाजपसोबत युतीची चर्चा सुरु होती. शिवसेनेने नांदगाव नगरपरिषदेसाठी कोअर कमिटी स्थापना करून युती संदर्भात भाजपासोबत खलबते सुरु होते. अखेर त्यात समीर भुजबळांना अपयश आलं तर सुहास कांदे यांनी बाजी मारली आहे.

Chhagan Bhujbal, Sameer Bhujbal, Suhas Kande
Chhagan Bhujbal : भुजबळांची ताकद वाढली ! विधानसभेला दुरावलेले दोन मातब्बर नेते पुन्हा आले जवळ, जिल्हा परिषद लढतीची तयारी

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या आदेशानुसार तसेच आमदार राहुल आहेर, भाजपा जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांच्या समंतीने शिवसेना -भाजप युती करण्याचा निर्णय झाल्याची घोषणा आमदार सुहास कांदे व भाजपा तालुकाध्यक्ष संजय सानप यांनी पत्रकारपरिषदेत केली. दरम्यान आता मनमाड नगरपरिषदेत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत.

यावेळी व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड, राजीव धामणे, उमेश उगले, दिपक देसले, सचिन पांडे सतिश शिदे, रेखा शेलार, समृद्धी बँकेचे चेअरमन अंजुम कांदे, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, तालुकाध्यक्ष साईनाथ गिडगे, सुनील जाधव, अमोल नांवदर, विलास आहेर, रोहीणी मोरे, शरद उगले, तसेच शिवसेना-भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com