Chhagan Bhujbal Politics : माझी पतंग कापणारा अद्याप कोणीही नाही! भुजबळांकडून काटाकाटी, पक्षांतर्गत विरोधकांना इशारा?

Patang Mahotsav Yeola Constituency in Nashi : माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : माजी मंत्री छगन भुजबळ विरोधकांना उत्तर दिल्याशिवाय राहत नाहीत. आपल्या राजकीय विरोधकांना त्यांनी सहज सोडलेले नाही. आजही त्यांनी अशाच सुचक शब्दांत आपल्या विरोधकांना सुनावले आणि अनेकांच्या पतंगी कापल्या.

येवला शहर पैठणी याबरोबरच पतंग यासाठी देखील प्रसिद्ध आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांचा हा मतदारसंघ आहे. उद्या पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये भुजबळही सहभागी होणार आहेत. तसेच पतंग उडवण्याचा आनंदही लुटणार आहेत. पण त्याआधीच रविवारी त्यांनी विरोधकांच्या राजकीय पंतग कापल्या.

Chhagan Bhujbal
MP Supriya Sule News : नैतिकता म्हणून तरी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा!

पतंग महोत्सवात सहभागी होण्यासाठी आलेल्या भुजबळांनी अतिशय सूचक आणि समर्पक शब्दांत आपल्या विरोधकांना उत्तर दिले. ते म्हणाले, ‘राजकारणात मी अनेकांच्या पतंग कापल्या आहेत. पक्षांतर्गत सहकाऱ्यांबरोबरही पतंग खेळू. माझी पतंग कापणारा अद्याप कोणीही नाही.’ भुजबळ यांनी हे सूचक विधान आपल्या पक्षांतर्गत विरोधकांसाठी इशारा म्हणून तर दिलेले नाही ना? अशी चर्चा आहे.

ते म्हणाले, माझा पतंग कापलेला नाही. या येवला मतदारसंघात मी राहत नाही. माझे कुटुंब येवला मतदारसंघात नाही. तरीही येथील जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. विश्वास व्यक्त केला आहे. येवला मतदारसंघातून मी चार वेळा विजयी झालो आहे. गेली 20 वर्ष मी या मतदारसंघाचा आमदार आहे. पुढच्या पाच वर्षासाठी या मतदारसंघातून आमदार आहे. त्यामुळे या मतदारसंघातून किंवा राजकारणातून माझा पतंग कोणीही कापलेला नाही.

Chhagan Bhujbal
Devendra Fadnavis : शिर्डीच्या अधिवेशनात फडणवीसांनी लोकसभेची ‘ती’ खंत बोलून दाखवलीच; म्हणाले, ‘मनातून नापास झालो होतो’

भुजबळ गेली अनेक वर्षे येवल्याच्या पतंग उत्सवात सहभागी होतात. यावेळी ते आपले समर्थक कार्यकर्ते आणि मतदारांची गप्पा मारतात. पतंग उडविण्याचा आनंदही घेतात. उद्याही ते पतंग महोत्सवात सहभागी होणार असल्याने कार्यकर्त्यांसाठी ही पर्वणी असणार आहे.

प्रदीर्घकाळ राज्याच्या राजकारणात आपली वर्चस्व टिकवून ठेवलेले भुजबळ सध्या विशेष चर्चेत आहेत. यंदा पहिल्यांदाच त्यांचा मंत्रिमंडळात सहभाग झालेला नाही. त्यामुळे भुजबळ नाराज असल्याचे लपून राहिलेले नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज राजकीय पतंग बाजी केली. त्यामुळे ही पतंग बाजी चांगलीच चर्चेत आहे. त्यांच्या विधानाचा त्यांच्या समर्थकांनी भरपूर आनंद घेतला. या निमित्ताने आपल्या समर्थकांना आत्मविश्वास देणारा संदेश त्यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com