Chhagan Bhujbal Politics : छगन भुजबळ यांचे मंत्रिमंडळात जोरदार कमबॅक; ओबीसी नेतृत्व पुन्हा सत्तास्थानी

Chhagan Bhujbal Will be Effective in the State Cabinet: छगन भुजबळ यांचा अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून आज शपथविधी होत आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News: गेल्या वीस वर्षांपासून प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा अग्रक्रमाने समावेश होत आला आहे. यंदा भुजबळ यांची ती संधी हुकली होती. मात्र भुजबळ यांच्या 'ओबीसी' राजकीय कार्ड मुळे ती पुन्हा जुळून आली आहे.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ येवला (नाशिक) मतदार संघातून २००४ पासून सातत्याने पाच वेळा विजयी झाले आहे. यातील चारही वेळा ते राज्य मंत्रिमंडळात होते. मुख्यमंत्री बदलले मात्र मंत्री म्हणून भुजबळ कायम होते. यातील सर्वाधिक काळ ते नाशिकचे पालकमंत्री राहिले आहेत.

यंदा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार मध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यावर श्री भुजबळ शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या गोटात दाखल झाले होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना मंत्री म्हणून वगळले होते. त्यामुळे भुजबळ कधी थेट तर कधी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांनाही राजकीय आव्हान देत होते.

Chhagan Bhujbal
Shrirampur Market Committee : श्रीरामपूरात विखे पॅटर्न; बाजार समितीतील नऊ संचालकांच्या राजीनाम्यानं खळबळ

लोकसभा निवडणुकीत केंद्र शासनात ओबीसी चेहरा म्हणून राष्ट्रीय राजकारणात जाण्याची चाचपणी श्री भुजबळ यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी नाशिकची उमेदवारी मागितली होती. मात्र शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने नाशिक मतदार संघ सोडण्यास नकार दिला होता. त्यावरून देखील महायुतीत भुजबळ यांच्या निमित्ताने वादाची ठिणगी पडली होती.

Chhagan Bhujbal
Nilesh Lanke On Radhakrishna Vikhe : 'उनके इरादों में गड़बड़ है'; खासदार लंकेंचा विखे पिता-पुत्रावर निशाणा

या संदर्भात श्री भुजबळ यांनी वेळोवेळी लोकसभा निवडणूक असो वा राज्य मंत्रिमंडळातील संधी प्रत्येक वेळी भारतीय जनता पक्षाला जवळ केले. त्यातून ओबीसी कार्ड खेळण्याचा प्रयत्न सातत्याने केला. राजकारणात चर्चेत राहण्याचे सातत्य व कौशल्य भुजबळ यांच्या मदतीला आले.

मस्साजोग (बीड) येथे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि त्यावरून राजकारण पेटले. त्यातून ओबीसी राजकारण आणि यातून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप झाले. आरोपांमुळे राजकीय दबावातून श्री मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. हा राजीनामा छगन भुजबळ यांच्या पथ्यावर पडला.

या निमित्ताने मुंडे यांच्या रिक्त जागेवर ओबीसी चेहरा म्हणून भुजबळ यांची वर्णी लागली आहे. गेल्या सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्रिमंडळात दमदार एन्ट्री करीत आहे. ओबीसी चेहरा म्हणून मंत्रिमंडळात ते नक्कीच आपला प्रभाव पाडतील. त्या दृष्टीने मंत्रिमंडळात आणि राज्य सरकार भुजबळ यांच्या प्रवेशाकडे कसे पाहते याची उत्सुकता कायम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com